पाच लाखापेक्षा कमी किंमतीत येणार इलेक्ट्रीक कार? काय आहे योजना

Prathamesh
3 Min Read

जर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये कार खरेदी करायची असेल तर एक चांगली ऑफर येत आहे. येथे तुम्हाला पाच लाखांच्या किंमतीत येणाऱ्या काही कारची माहिती तुम्हाला आम्ही देत आहोत. या कार विकत घेण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे जमा करण्याची वाट पाहावी लागणार नाही. तुमच्या बजेटमध्ये या कार विकत घेणे तुम्हाला परवडणार आहे. या कार Renault, MG Motors आणि Maruti Suzuki कंपनीच्या असणार आहेत.या कारची माहिती वाचा आणि गरजेप्रमाणे कोणती कार तुम्हाला सुट होते याचा निर्णय घ्या.या कार खरेदी करण्यासाठी जादा बजेटची गरज नाही. या बजेटमध्ये तुम्ही इलेक्ट्रीक कार देखील खरेदी करु शकता…

MG Comet EV इलेक्ट्रीक कार
या इलेक्ट्रीक कारची MG BaaS Plan सोबत केवळ ४.९९ लाखाची एक्स शोरुम किंमत ठेवली आहे. ही कार सर्वात स्वस्त कारपैकी एक आहे. कॉमेट ईव्ही ३.५ तासात ० ते १०० टक्के चार्ज होऊ शकते. ही कार ड्रायव्हींग रेंज देखील चांगली देत आहे. फूल चार्ज असल्यास ही कार २३० किमीपर्यंतची रेंज ऑफर करीत आहे.
प्लान काय आहे नेमका ?
या प्लानमध्ये प्रति किलोमीटर २.५ रुपये बॅटरी रेंटल द्यावे लागले. प्रति किलोमीटर पे करण्याच्या या स्कीममुळे ही कार इतकी स्वस्त झालेली आहे. जर तुम्हाला बॅटरी रेंटलचे ऑप्शनवर जायचे नसेल तर तुम्हाला ही कार ६ लाख ९८ हजार रुपयांना ( सुरुवातीची एक्स शोरुम किंमत ) पडणार आहे.

हे सुद्धा वाचा

Renault Kwid किंमत आणि मायलेज
या कारची किंमत ४ लाख ६९ हजार ५०० रुपयांपासून ( एक्स शोरुम )सुरु होत आहे. ही किंमत हॅचबॅकच्या बेस व्हेरिएंटची आहे. जर तुम्हाला टॉप व्हेरीएंट घ्यायचे असेल तर ६ लाख ४४ हजार ५०० रुपये ( एक्स शोरुम )मोजावे लागेल. पाच लाखांहून कमी रुपयात या कारचे RXE 1.0L, RXL(O) 1.0L आणि RXL(O) Night & Day Edition 1.0L व्हेरिएंट खरेदी करावे लागेल. हे हॅचबॅक २१.४६ ते २२.३ kmpl पर्यंतच्या मायलेजची ऑफर देत आहे.
Maruti Suzuki Alto K10
मारुती सुझुकीची ही परवडणारी कार चांगल्या मायलेजची ऑफर देत आहे. कमी बजेटमधील ही कार सर्वात पसंदीची ठरली आहे. कारची पेट्रोल ( मॅन्युअल ) व्हेरीएंट २४.३९ km/l,पेट्रोल ( ऑटो गियर शिफ्ट ) २४.९० km/l आणि सीएनजी व्हेरिएंटची किंमत ३३.८५ km/kg आहे. Maruti Suzuki Alto K10 ची एक्स शोरुम किंमत ३ लाख ९९ हजार रुपये पासून ५ लाख ९६ हजार रुपयांपर्यंत आहे.

Source link

Share This Article