नव्या वर्षापासून BMW च्या सर्व मॉडेल्सच्या किंमतीत वाढ, सर्व कार महागणार

Prathamesh
2 Min Read

जर्मनीतील लक्झरी कार कंपनी बीएमडब्ल्यूने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने नव्या वर्षापासून आपल्या सर्व कार महाग करण्याची घोषणा केली आहे. अनेक वाहन उत्पादक कंपन्या नवीन वर्षात आपल्या सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढवतात. यात लक्झरी कार कंपन्यांपासून प्रवासी वाहन कंपन्यांचाही समावेश आहे. नोव्हेंबर महिना संपत आला असून आता ऑटो कंपन्या हळूहळू आपल्या सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढवण्याची घोषणा करू शकतात. अलीकडेच आणखी एक लक्झरी कंपनी मर्सिडीजनेही आपले सर्व मॉडेल्स महाग केले आणि किंमत वाढवण्याची घोषणा केली.

बीएमडब्ल्यू इंडियाची कार महाग
कंपनीने नव्या वर्षापासून त्यांच्या सर्व मॉडेल्सवर जास्तीचा कर आकाराला जाणार असून कारच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे कारच्या किंमतीत वाढ झाल्याची कंपनीकडून घोषणा करण्यात आली आहे. नवीन वर्षात सर्व सेगमेंटच्या कार महागणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. बीएमडब्ल्यू इंडिया पुढील वर्षी जानेवारीपासून त्यांच्या सर्व मॉडेल्सच्या किंमती तब्बल ३ टक्क्यांनी वाढवणार आहे. नवे दर १ जानेवारी २०२५ पासून लागू होतील.
कंपनीच्या स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या कारमध्ये २-सीरिज ग्रॅन कूप, ३-सीरिज लाँग व्हीलबेस, ५-सीरिज लाँग व्हीलबेस, ७-सीरिज लाँग व्हीलबेस, एक्स १, एक्स ३, एक्स ५, एक्स७ आणि एम ३४० आय यांचा समावेश असणार आहे. बीएमडब्ल्यू आय ४, आय ५, आय ७, आय७ एम ७०, आयएक्स १, बीएमडब्ल्यू आयएक्स, झेड ४ एम ४० आय, एम २ कूप सारख्या मॉडेल्सची पूर्णपणे बिल्ट युनिट्स (सीबीयू) म्हणून विक्री केली जाणार आहे.

मर्सिडीजने मॉडेल्सही महाग केल्या
नव्या वर्षापासून मर्सिडीज राइड महागणार आहे. जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने नव्या वर्षापासून दरवाढीची घोषणा केली आहे. १ जानेवारी २०२५ पासून त्यांच्या वाहनांच्या किंमतीत ३ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. वाढता खर्च, महागाईचा दबाव आणि जास्त ऑपरेटिंग खर्च यामुळे हे पाऊल उचलावे लागल्याचे कंपनीने म्हटले आहे.
मर्सिडीज-बेंझ कारच्या किंमतीत जीएलसीसाठी दोन लाख रुपयांपर्यंत आणि मेबॅक एस ६८० लक्झरी लिमोझिनच्या किंमतीत नऊ लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे, असे मर्सिडीज-बेंझ इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे.

Source link

Share This Article