TVS iQube And Bajaj Chetak Sale: भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी दिवसेंदिव वाढत आहे. तसेच इलेक्ट्रिक स्कूटरबाबत ग्राहकांचा विश्वास अधिक वाढला आहे. परंतू भारतीय बाजारपेठेतील ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत सातत्याने होत असलेली घसरण आणि TVS-Bjaj सारख्या नामांकित कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे.
TVS iQube ची विक्री?
आता जर आम्ही तुम्हाला बजाज आणि TVSच्या मागील महिन्याच्या इलेक्ट्रिक स्कुटरच्या विक्री अहवालाविषयी सांगतो, म्हणजे सप्टेंबर 2024, TVS iQube ही मागील महिन्यात दुसरी सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर होती आणि ती 28,529 ग्राहकांनी विकत घेतली होती. iQube इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत वार्षिक 40 टक्क्यांहून अधिक आणि मासिक सुमारे 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Mahindra Thar 3-Door Earth एडिशनवर भरघोस सूट; जाणून घ्या डिटेल्स
बजाज चेतकच्या विक्रीत 217 टक्क्यांनी वाढ
बजाज ऑटोची एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर चेतक इलेक्ट्रिकने गेल्या सप्टेंबरमध्ये 28,517 युनिट्सची विक्री केली आणि ही वर्षभरात 217 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बजाज चेतकच्या मासिक विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. टीव्हीएस आणि बजाज सारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर लोकांचा आता अधिक विश्वास असल्याचे यावरून दिसून येते.
TVS iQube ची किंमत आणि फीचर्स
TVS मोटर कंपनीच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर iQube ची एक्स-शोरूम किंमत 1.07 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 1.37 लाखांपर्यंत जाते. या स्कूटरची बॅटरी 2.2 Kwh ते 3.4 kWh पर्यंत आहे आणि त्याची सिंगल चार्ज रेंज 75 किलोमीटर ते 100 किलोमीटर आहे. TVS iQube चा टॉप स्पीड 75 kmph आहे. लूक आणि फीचर्सच्या बाबतीत iQube खूप चांगला आहे.
बजाज चेतकची किंमत आणि फीचर्स
बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 99,998 रुपये ते 1.56 लाख रुपये आहे. या प्रीमियम स्कूटरची बॅटरी 2.88 Kwh ते 3.2 Kwh पर्यंत आहे आणि त्याची सिंगल चार्ज रेंज 123 किमी ते 123 किमी आहे. बजाज चेतकचा टॉप स्पीड 63 किमी प्रतितास ते 73 किमी प्रतितास आहे. चेतक इलेक्ट्रिक लूक आणि फीचर्सच्या बाबतीत खूप चांगले आहे.