HomeऑटोमोबाईलMaruti, Hyundai आणि Mahindra च्या या कार्सवर लाखो रुपयांचा Discount

Maruti, Hyundai आणि Mahindra च्या या कार्सवर लाखो रुपयांचा Discount

दिवाळीच्या खास प्रसंगी Maruti Suzuki, Hyundai आणि Mahindra या ऑटो कंपन्यांकडून नव्या कारच्या खरेदीवर लाखो रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. मारुति, महिंद्रा आणि हुंडईचे कोण-कोणते मॉडल्स तुम्हाला किती स्वस्तात मिळणार ते जाणून घ्या.

Mahindra Cars Discount

महिंद्रा थार 4×4 सोबत 1.25 लाख रुपयापर्यंत कॅश डिस्काऊंट आणि 25 हजार रुपयाची फ्री एक्सेसरीज मिळणार आहे. तेच, Bolero Neo सोबत 70 हजार रुपयाचा कॅश डिस्काऊट, 30 हजार रुपयाची फ्री एक्सेसरीज आणि 20 हजार रुपयाचा एक्सचेंज बोनस मिळतोय. महिंद्राच्या इलेक्ट्रिक कार XUV400 वर EL Pro FC वेरिएंटवर 3 लाख रुपयांचा डिस्काऊंट मिळतोय.

Hyundai Cars Discount

हुंडईची पॉपुलर हॅचबॅक Grand i10 Nios वर 45 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल. त्याशिवाय एक्सचेंज आणि कॉर्पोरेट डिस्काऊंटचा सुद्धा फायदा मिळेल. Venue 1.2 च्या काही वेरिएंट्सवर 50 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट आणि 15 हजार रुपयाचा एक्सचेंज बोनस मिळेल. त्याशिवाय हुंडई Alcazar Facelift वर 55 हजार रुपये कॅश, 30 हजार रुपयापर्यंत एक्सचेंज डिस्काऊंट मिळणार आहे.

Maruti Suzuki Car Discounts

मारुति Jimny च्या Zeta वेरिएंटर 1.75 लाख रुपयापर्यंत आणि अल्फा वेरिएंटवर 2.30 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. Brezza Urbano Edition च्या LXI वेरिएंटवर 27 हजार रुपये कॅश आणि VXI वेरिएंटवर 15 हजार रुपयापर्यंत कॅश डिस्काऊंट दिला जातोय. त्या शिवाय या गाड्यांवर 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. हायब्रिड टेक्नोलॉजीसोबत येणाऱ्या Grand Vitara Strong Hybrid मॉडलवर 50 हजार रुपये कॅश आणि 50 हजार रुपयापर्यंत एक्सचेंज बोनस मिळेल.

लक्ष द्या

मारुती सुजुकी, हुंडई आणि महिंद्रा कंपनीच्या कार्सवर दिवाळी ऑफर कधीपर्यंत आहे? याची माहिती नाहीय. या मॉडल्सवर 31ऑक्टोंबरपर्यंत ऑफरचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.

Source link

Must Read

spot_img