HomeऑटोमोबाईलShah Rukh Khan : SRK च्या वॅनिटीमध्ये असं काय खास? अनुष्काची सुद्धा...

Shah Rukh Khan : SRK च्या वॅनिटीमध्ये असं काय खास? अनुष्काची सुद्धा नजर, किंमत ऐकून विस्फारतील डोळे

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. शाहरुख आज 59 वर्षांचा झाला. शाहरुख खान जितका आपल्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्यापेक्षा तो त्याच्या लग्जरी लाइफसाठी सुद्धा ओळखला जातो. शाहरुख खूप मेहनती कलाकार आहे, असं त्याच्या बाबतीत म्हटलं जातं. पाऊस, ऊन किंवा सर्दी याची परवा केल्याशिवाय तो शूट पूर्ण करतो. हे सर्व करणं त्याला शक्य होतं, ते त्याच्या वॅनिटी व्हॅनमुळे. शाहरुखची ही चालती फिरकी वॅनिटी व्हॅन कुठल्या आलिशान घरापेक्षा कमी नाहीय. त्याच्या शाहरुखच्या आरामाचा, सुविधेचा पूर्ण विचार करण्यात आलाय.

शाहरुख खानने आपली वॅनिटी व्हॅन प्रसिद्ध ऑटो डिजायनर दिलीप छाब्रिया यांच्याकडून डिजाइन करुन घेतली आहे. या वॅनिटी व्हॅनची किंमत 4 कोटीपेक्षा जास्त आहे. यात फ्लोरिंग काच आणि वुडनच वर्क आहे. या व्हॅनमध्ये शाहरुखच्या सर्व गरजांचा विचार करण्यात आलाय. शाहरुख खानच्या वॅनिटी व्हॅनच सर्वात मोठ वैशिष्टय म्हणजे ही संपूर्ण वॅन एका आयपॅडने कंट्रोल करता येते. व्हॅनमध्ये एक पेंट्री सेक्शन, एक कपाट, मेकअप रु आणि टॉयलेट आहे. व्हॅनमध्ये इलेक्ट्रिक चेयर आहे. एक बटण दाबताच एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात घेऊन जाते.

अनुष्का शर्माची सुद्धा नजर

सिद्धार्थ मल्होत्रान एका मुलाखतीत शाहरुखच्या व्हॅनिटी वॅनच्या एका फिचरबद्दल सांगितलं होतं. शाहरुखच्या व्हॅनमध्ये एका इलेक्ट्रीक चेयर आहे, त्याद्वारे चारही बाजूंना फिरता येतं. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची नजर सुद्धा किंग खानच्या अनेक वस्तुंवर आहे. ‘झीरो’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अनुष्का शर्माला विचारण्यात आलं, तिला शाहरुखच्या कुठल्या कुठल्या गोष्टी पळवायला आवडतील. त्यावर तिने हसत-हसत उत्तर दिलं, शाहरुखच्या मला अशा अनेक गोष्टी चोरायच्या आहेत. यात शाहरुखच शानदार घड्याळांच कलेक्शन आहे. त्याशिवाय मन्नत बंगला आणि वॅनिटी व्हॅन सुद्धा मला चोरायची आहे असं ती म्हणाली.

Source link

Must Read

spot_img