Joy e-bike hydrogen scooter: जॉय ई-बाईकची मूळ कंपनी वॉर्डविझार्ड सतत हायड्रोजन इंधन सेल आणि इलेक्ट्रोलायझर तंत्रज्ञानावर काम करत आहे. या तंत्रज्ञानाअंतर्गत ही स्कूटर पाण्यावर चालते.
जॉय ई-बाईकने या स्कूटरच्या अंतिम उत्पादनाबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये ही स्कूटर पुन्हा एकदा सादर केली जाऊ शकते. एवढेच नाही तर ही स्कूटर ऑटो एक्सपो 2025 मध्येही दाखवण्यात येणार आहे. यावेळी या स्कूटरबाबत बरीच माहिती मिळण्याची शक्यता आहे.
(वाचा)- Tata Nexon की Curvv… सरकार कोणत्या कारवर जास्त टॅक्स लावत आहे, यात तुमचा काय फायदा?
जॉय ई-बाईक हायड्रोजन स्कूटरची वैशिष्ट्ये
रिपोर्ट्सनुसार, Joy e-bike ची मूळ कंपनी Wardwizard सतत हायड्रोजन फ्युएल सेल आणि इलेक्ट्रोलायझर तंत्रज्ञानावर काम करत आहे. या तंत्रज्ञानाअंतर्गत ही स्कूटर पाण्यावर चालते. म्हणजेच, ही स्कूटर लाँच होताच प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, कारण ही स्कूटर डिस्टिल्ड वॉटरवर चालते. हायड्रोजन वेगळे केल्यावर स्कूटर चालवण्यासाठी हायड्रोजनचा वापर इंधन म्हणून केला जातो.
ड्रायव्हिंग लायसन्सची गरज भासणार नाही
पाण्यावर चालणाऱ्या या स्कूटरचा टॉप स्पीड 25kmph पर्यंत असू शकतो, जो आणखी वाढवता येऊ शकतो. तुम्हाला ते चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज भासणार नाही किंवा तुम्हाला त्याची नोंदणी करण्याची गरज नाही. या स्कूटरमध्ये पॅडल्सही देण्यात आले आहेत. काही कारणास्तव त्याची रेंज संपली तर पेडलच्या मदतीनेही चालवता येते.
(वाचा)- धनत्रयोदशीच्या दिवशी या कंपनीने दिल्ली-एनसीआरमध्ये 100 हून अधिक इलेक्ट्रिक कार केल्या डिलिव्हर
1 लिटरमध्ये 150 किलोमीटर अंतर
भारतात अशा अनेक ऑटो कंपन्या आहेत ज्या हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांवर काम करत आहेत, जॉय ई-बाईकच्या या हायड्रोडॉन स्कूटरची नेमकी माहिती समोर आली आहे, त्यानुसार ही स्कूटर एक लिटर पाण्यात 150 किलोमीटर अंतर कापेल, असा दावा केला जात आहे. तथापि, हा एक प्रोटोटाइप आहे, याचा अर्थ ही स्कूटर अद्याप विक्रीसाठी उपलब्ध नाही.