Suresh Raina Buy Kia Carnival Limousine: सुरेश रैनाने दिवाळीपूर्वी किआ कार्निवल ही आलिशान कार घरी आणली आहे. ही कार 3 ऑक्टोबर रोजी भारतात लाँच करण्यात आली होती. त्याची किंमत 50 लाखांपेक्षा जास्त आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने आपल्या घरी एक नवीन किया कार्निवल लिमोझिन आणली आहे. गाडीची चावी हाताता मिळाल्यानंतर सुरेश रैनानेही केक कापून आनंद साजरा केला. Kia ची ही नवीन कार या महिन्याच्या सुरुवातीला 3 ऑक्टोबर रोजी भारतात लाँच करण्यात आली होती. हा नवीन किया कार्निवल पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पॉवरट्रेनसह बाजारात लाँच करण्यात आली आहे. या लक्झरी कारची एक्स-शोरूम किंमत 63.90 लाख रुपयांपासून सुरू होते. (वाचा)-रणवीर-दीपिकाने लेकीला दिले करोडोंचे गिफ्ट; घरी आणली आलिशान रेंज रोव्हर, पाहा काय आहे खास
किया कार्निवलची वैशिष्ट्ये
नवीन किया कार्निव्हल भारतीय बाजारपेठेत दोन कलर व्हेरिएंटसह लाँच करण्यात आली आहे. ही 7 सीटर कार आहे. या कारला फ्युजन ब्लॅक आणि ग्लेशियर व्हाइट पर्ल कलर देण्यात आला आहे. या वाहनाच्या आतील भागात Tuscan आणि Umber 2 टोन रंग आहे. या लक्झरी कारमध्ये वाईड इलेक्ट्रिक ड्युअल सनरूफ देखील उपलब्ध आहे. लोकांच्या मनोरंजनासाठी हे वाहन 12-स्पीकर बोस सिस्टमने सुसज्ज आहे.
या Kia कारमध्ये वायरलेस चार्जिंगचा पर्यायही उपलब्ध आहे. या वाहनात 18-इंच डायमंड कट अलॉय व्हील आहेत. ड्रायव्हिंगचा अनुभव सुधारण्यासाठी या कारमध्ये पॅडल शिफ्टर्स देखील देण्यात आले आहेत. या Kia कारमध्ये ADAS आणि 360-डिग्री कॅमेराची सुविधा देखील आहे. या कारला सुरक्षेसाठी 8 एअरबॅगही देण्यात आल्या आहेत. किआ कार्निव्हलमध्ये ऑटोमॅटिक एअर कंट्रोल आणि मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हीलचे फीचर देखील आहे. (वाचा)- यंदाच्या दिवाळीत Audi, BMW, Mercedes सारख्या लग्झरी कार खरेदी करण्याचा विचार करताय? मिळत आहे लाखो रुपयांचे डिस्काउंट
किया कार्निवल पॉवर
Kia Carnival Limousine च्या डिझेल व्हेरिएंटमध्ये 2151 cc 4-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 190 bhp ची शक्ती प्रदान करते आणि 441 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधा देण्यात आली आहे. या लक्झरी कारची इंधन टाकीची कॅपिसीटी 32 लीटर आहे. ही Kia कार 14.85 kmpl चा मायलेज देते.
लेखकाबद्दलहर्षदा हरसोळेहर्षदा सुदर्शन हरसोळे ही हुशार आणि चांगली लेखिका आहे. गेल्या तीन वर्षांपासून हर्षदा या पत्रकारितेत चांगल आणि उत्तम काम करत आहेत. हर्षदा यांनी त्यांच्या कामाची सुरुवात प्रिंट माध्यपासून केली. व त्यांनी या मध्ये एक वेगळाच ठसा उमटवला आहे. हर्षदा यांची दृष्टी उत्सुकता असणारी आणि चौकस बुद्धीची आहे. तसेच हर्षदा या कोणतेही काम अगदी चांगल्या प्रकारे हाताळतात. यांना वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायला, आणि शिकायला आवडतं. तसेच हर्षदाचं लिखाण वैविध्यपूर्ण आहे.
प्रिंट मीडियाचं जे जग आहे त्याच्यात हर्षदा यांचा प्रवास खूप चांगला राहिला आहे. तसेच यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे बिट असतात त्यांनी त्या उत्तम प्रकारे सांभाळल्या आहेत. ऍटोमोबाइल पासून लाईफस्टाईल पर्यंत किंवा बॉलीवूड यासारखे बिट त्यांनी कौशल्यपूर्ण हाताळल्या आहेत. तसेच या कामासाठी जे तंत्रज्ञान वापरावं लागतं ते सुद्धा त्या चांगल्या हाताळतात. वेगवेगळ्या विषयांचे जे मुद्दे असतात ते हर्षदा पटकन समजून घेते. त्यामुळे त्यांच्या लिखाणात कायम वैविध्य दिसतं.
गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारितेमध्ये त्यांनी अगदी मन लावून आणि छान काम केलं आहे. यामुळे हर्षदाचा या क्षेत्रातला अनुभव वाढत गेलाय आणि त्या एक्स्पर्ट झाल्या आहेत. या क्षेत्रात जसे बदल होत गेले तसे हर्षदा यांनी त्यांच्या कामात केले आहे. तसेच हर्षदा मन लावून विचारपूर्वक लिखाण करतात. जे वाचकांना आकर्षक करणार असतं, आणि चांगली माहिती देणार असतं. तसेच हर्षदा यांना नवं नवीन गोष्टी शिकण्याची आणि समजून घेण्याची प्रचंड आवड आहे.
हर्षदा बद्दल एक सांगायचं झाल्यास, या व्यावसायिक गुणांच्या व्यक्तीरिक्त हर्षदा यांना काही छंद आहेत. त्यांना फोटोग्राफी आवडते, तसेच चांगले क्षण टिपायला देखील आवडतात…. आणखी वाचा