“तू तो गया”! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध ‘स्लेजिंग’; व्हिडिओ व्हायरल

Prathamesh
2 Min Read


Sarfaraz Khan’s Fiery Send-Off To Rachin Ravindra Video Goes Viral : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदरनं टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. सुंदर गोलंदाजी करत वॉशिंग्टन यानं किवी संघाचा कॅप्टन टॉम लॅथम (Tom Latham) आणि स्टार बॅटर रचिन रविंद्र (Rachin Ravindra) या दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. 

सर्फराज खानचा अंदाज ठरतोय चर्चेचा विषय

या दोन्ही विकेट्स अगदी सेम टू सेम अंदाजात पडल्या. रचिन रविंद्रचा बोल्ड उडल्यावर ही विकेट टॉम लॅथमच्या विकेट्सचा रिप्लाय आहे की, काय असंच वाटतं होते. एकसारख्या पडलेल्या विकेट्समध्ये एक वेगळेपण दिसून आलं ते म्हणजे सर्फराज खाननं हटके अंदाज या विकेट्सचं कलेले सेलिब्रेशन.  

नेमकं काय घडलं?

न्यूझीलंडच्या डावातील २० व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदर याने रचिन रविंद्रच्या रुपात न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. वॉशिंग्टन सुंदरनं टाकलेला फुल लेंथ चेंडूचा टप्पा ऑफ स्टंपच्या जवळपास पडला. रचिन बचावात्मक पद्धतीने खेळताना फसला अन् त्याचा त्रिफळा उडला. या विकेट्सनंतर सिली पॉइंटवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या सर्फराज खान याने अगदी जोशात अन् प्रतिस्पर्धी बॅटरला शाब्दिक मारा करत सेलिब्रेसन केल्याचे पाहायला मिळाले. “तू तो गया” असंच काहीसे म्हणत त्याने केलेल्या सेलिब्रिशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

सर्फराजनं फिल्डवरील हटके अंदाजानं याआधीही वेधलं  होतं लक्ष

न्यूझीलंड विरुद्ध दिडशतकी खेळीसह आपल्या भात्यातील फटेबाजीचा नजराणा पेश करत सर्वांच लक्ष वेधून घेणारा सर्फराज खान   फिल्डिंग वेळीही चांगलाच सजग असतो. याआधी DRS साठी कॅप्टन रोहितला मनवण्यासाठी त्याने मारलेल्या उड्या अन् भारतीय संघाला मिळाली विकेटचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता त्यात आणखी एका व्हिडिओची भर पडलीये.   

Web Title: IND vs NZ 3rd Test Sarfaraz Khan’s Fiery Send-Off To Rachin Ravindra After Sundar Cleans Him Up With A Peach Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.





Source

Share This Article