Salman Khan bulletproof Nissan Petrol: बॉलिवूड अभिनेता सलमान खानने निसान पेट्रोल एसयूव्ही नावाची आणखी एक बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. ही कार अनेक अॅडव्हान्स फीचर्ससह मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ही एसयूव्ही बॉम्ब अलर्ट इंडिकेटर आणि बंदुकीच्या गोळीबारापासून वाचवायला मदत करते. वृत्तानुसार, लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सलमान खानने ही कार घेतली असेल्याचे समोर आले आहे.
निसान पेट्रोल एसयूव्ही: फीचर
निसानची ही एसयूव्ही एक नव्हे तर अनेक अत्याधुनिक फीचर्सनी सुसज्ज आहे. यात बॉम्ब अलर्ट इंडिकेटर आणि गोळीबारपासून वाचायला मदत होते. एवढेच नाही तर कारमध्ये बसलेल्या लोकांच्या प्रायव्हसीसाठी टिंटेड विंडोही उपलब्ध आहेत.
निसान पेट्रोल एसयूव्ही: किंमत
रिपोर्ट्सनुसार, निसान कंपनीच्या या बुलेटप्रूफ एसयूव्हीची किंमत जवळपास 2 कोटी रुपये आहे. मात्र, अद्याप ही कार भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध नाही, कारण ही कार अद्याप भारतात लाँच झालेली नाही. त्यामुळे ती दुबईहून इंपोर्ट केली जात आहे.
बुलेटप्रूफ कार म्हणजे काय?
- कंपन्या बुलेटप्रूफ वाहनांची डिझाइन खास पद्धतीने करतात. ही कार बॉम्बस्फोट म्हणा किंवा गोळीबारापासून वाचवायला आपली मदत करते.
- बॅलिस्टिक प्रोटेक्शनमध्ये, हाय रेटिंग असलेल्या वाहनाला B1 ते B10 रेटिंग दिले जाते. यावरून ती किती हल्ले सहन करू शकते हे दिसून येते. अशा प्रकारे हे देखील समजले जाऊ शकते की वाहनाचे बॅलिस्टिक प्रोटेक्शन रेटिंग जितके जास्त असेल तितके ते अधिक स्ट्राँग असेल.
Car resale value: धनत्रयोदशीला जुन्या कारला मिळेल चांगली किंमत; रिसेल व्हेल्यूसाठी करा फक्त या 5 गोष्टी
कोणत्या मटेरियल पासून तयार होते कार?
- बुलेटप्रूफ कार स्टील, ॲल्युमिनियम आणि अतिशय मजबूत फायबर सारख्या मटेरियलपासून तयार होते. यासोबतच वाहनात जाड आणि स्ट्राँग काच बसवण्यात आली आहे, ज्यामुळे बंदूकीतून निघालेल्या गोळ्या काचेवर आदळत नाही.
- एवढेच नाही तर त्यांचे टायरही अशा पद्धतीने डिझाइन केलेले आहेत की त्यांना गोळी लागली तरी ते काही अंतरापर्यंत धावू शकतात. त्याच वेळी, त्याची किंमत इतर वाहनांपेक्षा जास्त आहे कारण ही वाहने बनवण्यासाठी वापरलेले मटेरियल खूप महाग आहे.
5.6-लिटर V8 पेट्रोल इंजिन
निसान पेट्रोल एसयूव्हीमध्ये सर्वात पॉवरफूल 5.6-लिटर V8 पेट्रोल इंजिन स्थापित केले गेले आहे जे 405 bhp आणि 560 Nm टॉर्क जनरेट करते. हे 9-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि स्टँडर्ड फोर-व्हील ड्राइव्ह सिस्टमसह येते.
टॉप सेफ्टी फीचर्स
- व्हर्टिकल पॅनल प्रोटेक्शन
- बुलेट Resistant Glass
- रुफ प्रोटेक्शन
- बॅटरी & CPU प्रोटेक्शन
- ब्लास्ट Protected Floor
- डोअर ओव्हलॅप प्रोटेक्शन
- Hidden Reinforced Rear Bumper
- Radiator Protection