Royal Enfield Bear 650: रॉयल एनफिल्ड लाँच करणार आणखी एक जबरदस्त बाईक; पाहा टिझर

Prathamesh
4 Min Read

भारतातील लोकप्रिय मोटरसायकल कंपनी Royal Enfield येत्या काही महिन्यांत आपली पहिली स्क्रॅम्बलर बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे ज्याचे नाव Bear 650 आहे.

हायलाइट्स:

  • रॉयल एनफिल्डची पहिली स्क्रॅम्बलर बाईक.
  • लुक्स आणि फीचर्स आहेत जबरदस्त.
  • येत्या 5 नोव्हेंबरला अनावरण होण्याची शक्यता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम114717093

रॉयल एनफिल्ड येत्या काही महिन्यांत भारतीय बाजारपेठेत अनेक चांगले प्रोडक्शन लाँच करणार आहे आणि त्यापैकी इलेक्ट्रिक बाईकसह पहिली स्क्रॅम्बलर बाईक आहे. त्या आगामी मोटरसायकलचे नाव Bear 650 आहे. तसेच टिझरही समोर आलेला आहे. 650 सीसी सेगमेंटची ही आगामी मोटरसायकल इंटरसेप्टर 650 ची हलकी आणि ऑफ-रोड ओरिएंटेड व्हर्जन मानली जात आहे, जी उत्कृष्ट लुक आणि अपग्रेड फीचर्ससह सुसज्ज असेल. जाणून घेऊ या बाईकचे सर्व डिटेल्स.
(वाचा)-मारुती स्विफ्ट, वॅगनआर आणि सेलेरियोवर 88000 रुपयांची सूट, ऑफर फक्त 31 ऑक्टोबरपर्यंत

लुक आणि फीचर्स

Royal Enfield Bear 650 च्या संभाव्य लुक आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, निओ-रेट्रो डिझाइन असलेली ही मोटरसायकल खूपच आकर्षक दिसते आणि इंटरसेप्टरपेक्षा खूपच चांगली दिसते. यात राउंड एलईडी हेडलॅम्प, कॉम्पॅक्ट रीअर डिझाइन, रेट्रो लुकिंग इंडिकेटर, सिंगल पीस सीट सेटअप, अपसाइड डाउन फ्रंट फोर्क्स, मागील बाजूस स्टील ट्विन शॉक ऍब्सॉर्बर्स, सिंगल एक्झॉस्ट सिस्टम आणि 5 इंच ट्रिपर डॅश असतील. Bear 650 मध्ये Google Maps आणि म्युझिक कंट्रोल सारखी फीचर देखील पाहता येतील.

इंजिन आणि पॉवरट्रेन

रॉयल एनफील्ड बेअर 650 च्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, कंपनीच्या इतर 650 सीसी मोटारसायकलींप्रमाणे यात 648 cc पॅरलल ट्विन ऑइल कूल्ड इंजिन असेल, जे 47 bhp ची कमाल पॉवर आणि 52 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करेल. या बाईकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स दिसेल. ही बाईक सिंगल आणि ड्युअल टोन अशा दोन्ही कलर पर्यायांमध्ये येईल.
(वाचा)- Yamaha कडून दिवाळी निमित्त आकर्षक ऑफर्स ! FZ आणि स्कूटर खरेदीवर आणली खास स्किम

या गाड्यांशी करणार स्पर्धा

आम्ही तुम्हाला सांगतो की, अलिकडच्या काही वर्षांत स्क्रॅम्बलर मोटरसायकलची मागणी जगभरात वाढली आहे आणि अशा परिस्थितीत रॉयल एनफील्ड त्याच्या आगामी Bear 650 च्या माध्यमातून लोकांना एक चांगला पर्याय देण्याची तयारी करत आहे. Bear 650 नुकत्याच लाँच झालेल्या BSA गोल्डस्टार तसेच ट्रायम्फ आणि इतर कंपन्यांच्या 650 सीसी बाईकशी स्पर्धा करेल.

हर्षदा हरसोळे

लेखकाबद्दलहर्षदा हरसोळेहर्षदा सुदर्शन हरसोळे ही हुशार आणि चांगली लेखिका आहे. गेल्या तीन वर्षांपासून हर्षदा या पत्रकारितेत चांगल आणि उत्तम काम करत आहेत. हर्षदा यांनी त्यांच्या कामाची सुरुवात प्रिंट माध्यपासून केली. व त्यांनी या मध्ये एक वेगळाच ठसा उमटवला आहे. हर्षदा यांची दृष्टी उत्सुकता असणारी आणि चौकस बुद्धीची आहे. तसेच हर्षदा या कोणतेही काम अगदी चांगल्या प्रकारे हाताळतात. यांना वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायला, आणि शिकायला आवडतं. तसेच हर्षदाचं लिखाण वैविध्यपूर्ण आहे.

प्रिंट मीडियाचं जे जग आहे त्याच्यात हर्षदा यांचा प्रवास खूप चांगला राहिला आहे. तसेच यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे बिट असतात त्यांनी त्या उत्तम प्रकारे सांभाळल्या आहेत. ऍटोमोबाइल पासून लाईफस्टाईल पर्यंत किंवा बॉलीवूड यासारखे बिट त्यांनी कौशल्यपूर्ण हाताळल्या आहेत. तसेच या कामासाठी जे तंत्रज्ञान वापरावं लागतं ते सुद्धा त्या चांगल्या हाताळतात. वेगवेगळ्या विषयांचे जे मुद्दे असतात ते हर्षदा पटकन समजून घेते. त्यामुळे त्यांच्या लिखाणात कायम वैविध्य दिसतं.

गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारितेमध्ये त्यांनी अगदी मन लावून आणि छान काम केलं आहे. यामुळे हर्षदाचा या क्षेत्रातला अनुभव वाढत गेलाय आणि त्या एक्स्पर्ट झाल्या आहेत. या क्षेत्रात जसे बदल होत गेले तसे हर्षदा यांनी त्यांच्या कामात केले आहे. तसेच हर्षदा मन लावून विचारपूर्वक लिखाण करतात. जे वाचकांना आकर्षक करणार असतं, आणि चांगली माहिती देणार असतं. तसेच हर्षदा यांना नवं नवीन गोष्टी शिकण्याची आणि समजून घेण्याची प्रचंड आवड आहे.

हर्षदा बद्दल एक सांगायचं झाल्यास, या व्यावसायिक गुणांच्या व्यक्तीरिक्त हर्षदा यांना काही छंद आहेत. त्यांना फोटोग्राफी आवडते, तसेच चांगले क्षण टिपायला देखील आवडतात…. आणखी वाचा

Source

Share This Article