HomeUncategorizedSecond Hand Cars : 7.50 लाखाची कार फक्त 3.80 लाख रुपयात, त्वरा...

Second Hand Cars : 7.50 लाखाची कार फक्त 3.80 लाख रुपयात, त्वरा करा, संधीचा फायदा उचला

फेस्टिव सीजनमध्ये तुम्ही नवीन Maruti Suzuki Baleno खरेदी करण्याचा विचार करताय का?. नवीन बलेनो विकत घेण्यासाठी पैसे कमी पडतायत का?. काही हरकत नाही. आम्ही तुम्हाला 4 लाख रुपयापेक्षा पण कमी किंमतीत Maruti Baleno विकत घेण्याचा मार्ग सांगतो. 4 लाख रुपयापेक्षा कमी किंमतीत नवीन बलेनो मिळणार नाही. पण बरेच असे प्लॅटफॉर्म आहेत, जिथे तुम्हाला कमी किंमतीत Second Hand Cars मिळू शकतात.

आज आम्ही तुम्हाला मारुति सुजुकीच्या Used Car प्लॅटफॉर्म Truevalue वर मिळणाऱ्या सेकेंड हँड बलेनोबद्दल सांगणार आहोत. 3 लाख 80 हजार रुपयात मिळणारी बलेनो किती जुनी आहे? किती पळाली आहे? त्या बद्दल जाणून घ्या.

Maruti Suzuki Baleno किती जुनी?

ट्रूवॅल्यूवर दिलेल्या माहितीनुसार, या यूज्ड कारच तुम्हाला 2017 सालच मॉडल मिळेल. ही हॅचबॅक पेट्रोल फ्यूल ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल गाडी तुम्ही 15 वर्ष चालवू शकता. अशा स्थितीत 2017 सालच हे मॉडल तुम्ही 2032 पर्यंत वापरु शकता. म्हणजे तुम्ही ही गाडी विकत घेतली, तर तुम्ही 8 वर्ष ही गाडी चालवू शकता.

एक्स्ट्रा फायदे काय?

मॅनुअल ट्रांसमिशन ऑप्शनमध्ये मिळणाऱ्या या कारच Delta वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ट्रूवॅल्यूवर दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी 75,120 किलोमीटरपर्यंत चालवण्यात आली आहे. फर्स्ट ओनरसोबत येणाऱ्या या कारमध्ये तुम्हाला काही एक्स्ट्रा फायदे सुद्धा मिळतील. या ट्रूवॅल्यूकडून 6 महिन्याची वॉरंटी, तीन फ्री सर्विस देण्यात येतील. या कारसोबत इंश्योरेंस मिळणार की नाही? याची माहिती दिलेली नाही.

लाखो रुपये वाचवा

मारुती सुजुकीच्या या हॅचबॅकची किंमत 6.60 लाख (एक्स-शोरूम) ते 9.80 लाख (एक्स-शोरूम) आहे. बलेनोच्या नव्या Delta वेरिएंटची किंमत 7 लाख 50 हजार (एक्स-शोरूम) आहे. या जुन्या मॉडलवर तुमचे लाखो रुपये वाचू शकतात.

लक्षात घ्या

जुनी सेकेंड हँड कार विकत घेण्याआधी गाडीचे सर्व डॉक्यूमेंट्स वेरिफाई करा. गाडीची तपासणी आणि डॉक्यूमेंट्स चेक केल्याशिवाय पेमेंट करण्याची चूक करु नका. ही बातमी फक्त माहितीसाठी आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img