INDW vs NZW 1st ODI | अहमदाबाद : आजपासून भारताचा महिला क्रिकेट संघ मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळत आहे. अलीकडेच न्यूझीलंडच्या संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला. ट्वेंटी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर टीम इंडियाचा प्रवास साखळी फेरीतच संपला. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने पराभूत केल्याने भारतीय संघ उपांत्य फेरी गाठू शकला नाही. २०१६ नंतर प्रथमच भारतावर ही नामुष्की ओढवली. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताची डोकेदुखी वाढली. कर्णधार हरमनप्रीत कौरला दुखापतीमुळे या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे स्मृती मानधनावर कर्णधारपदाची जबाबदारी आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मालिकेतील सर्व तीन सामने खेळवले जातील. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजल्यापासून खेळवले जातील.
पहिल्या सामन्यासाठी भारताचा संघ –
स्मृती मानधना (कर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दयालन हेमलथा, जेमिमा रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस (पदार्पण), दीप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, साइमा ठाकूर (पदार्पण), रेणुका ठाकूर.
भारताची नियमित कर्णधार हरमनप्रीतला विश्रांती दिल्याने युवा खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली. साइमा ठाकूर न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करत आहे. याशिवाय तेजल हसबनीस हिलादेखील टीम इंडियाची कॅप मिळाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Proud moment for Tejal Hasabnis and Saima Thakor as they receive their India caps from Jemimah and Smriti, respectively 👏👏
Live – https://t.co/VGGT7lSS13……… #INDvNZ@IDFCFIRSTBankpic.twitter.com/wgk0RN6n0l
— BCCI Women (@BCCIWomen) October 24, 2024
वन डे मालिकेचे वेळापत्रक –
२४ ऑक्टोबर, पहिला सामना
२७ ऑक्टोबर, दुसरा सामना
२९ ऑक्टोबर, तिसरा सामना
मालिकेसाठी भारतीय संघ –
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, डी हेमलथा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया, उमा छेत्री, सायली सतगरे, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, तेजल हसबनीस, सैमा ठाकूर, प्रिया मिश्रा, राधा यादव, श्रेयांका पाटील.