Hardik Pandya Buy Range Rover: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने एक आलिशान कार रेंज रोव्हर खरेदी केली आहे. हार्दिकचा कार चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉमHardik Pandya Buy Range Rover check Price & Details भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्याने नवीन रेंज रोव्हर कार खरेदी केली आहे. हार्दिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे. विमानतळाबाहेर आल्यानंतर हार्दिक त्याच्या नवीन रेंज रोव्हर कारमध्ये बसून स्वत: गाडी चालवत आहे. हार्दिकने स्वत:साठी लँड रोव्हर ही अप्रतिम आलिशान कार खरेदी केली आहे. ही कार भारतात चांगलीच लोकप्रिय होत आहे. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप नेत्या कंगना रणौतनेही रेंज रोव्हर खरेदी केली आहे. (वाचा)- Kunal Karma Vs Bhavish Agrawal: कुणाल कामरा यांना पुन्हा भाविश अग्रवालांवर साधला निशाणा; मागितला रिफंडचा प्लॅन, वाचा सविस्तर
हार्दिक पांड्याने खरेदी केली नवीन रेंज रोव्हर
हार्दिक पांड्या नुकताच भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 सामन्यादरम्यान खेळताना दिसला. भारताने ही सीरीज जिंकली. आता सामना संपल्यानंतर जेव्हा भारताचा स्टार खेळाडू विमानतळावर दिसला तेव्हा तो नवीन रेंज रोव्हर चालवताना दिसला.
रेंज रोव्हर पॉवर
लँड रोव्हर रेंज रोव्हर 2996 cc, 2997 cc आणि 2998 cc इंजिनसह उपलब्ध आहे. हे इंजिन 346 bhp ते 394 bhp पर्यंत पॉवर प्रदान करते. तसेच, 550 Nm ते 700 Nm पर्यंतचा टॉर्क निर्माण होतो. या कारचा टॉप स्पीड 234 किमी प्रतितास ते 242 किमी प्रतितास आहे. रेंज रोव्हर एसव्ही रणथंभौर एडिशन हे लेटेस्ट मॉडेल आहे. या गाडीची किंमत 5.72 कोटी रुपये आहे.
रेंज रोव्हर किंमत
लँड रोव्हर रेंज रोव्हरची अनेक मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत. रेंज रोव्हरची किंमत 2.36 कोटी रुपये आहे. तर रेंज रोव्हर स्पोर्टची किंमत 1.40 कोटी रुपये आहे. रेंज रोव्हर वेलार भारतात 87.90 लाख रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय रेंज रोव्हर इव्होकची किंमत 67.90 लाख रुपये आहे. नुकतेच लँड रोव्हरच्या या आलिशान कारचे रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी मॉडेलही भारतात आले आहे. या कारची ऑन रोड किंमत 2.99 कोटी रुपयांपासून सुरू होते. (वाचा)- ही इलेक्ट्रिक कार झाली अडीच लाख रुपयांनी स्वस्त! सिंगल चार्जिंगमध्ये देते 650 किमीची रेंज
लेखकाबद्दलहर्षदा हरसोळेहर्षदा सुदर्शन हरसोळे ही हुशार आणि चांगली लेखिका आहे. गेल्या तीन वर्षांपासून हर्षदा या पत्रकारितेत चांगल आणि उत्तम काम करत आहेत. हर्षदा यांनी त्यांच्या कामाची सुरुवात प्रिंट माध्यपासून केली. व त्यांनी या मध्ये एक वेगळाच ठसा उमटवला आहे. हर्षदा यांची दृष्टी उत्सुकता असणारी आणि चौकस बुद्धीची आहे. तसेच हर्षदा या कोणतेही काम अगदी चांगल्या प्रकारे हाताळतात. यांना वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायला, आणि शिकायला आवडतं. तसेच हर्षदाचं लिखाण वैविध्यपूर्ण आहे.
प्रिंट मीडियाचं जे जग आहे त्याच्यात हर्षदा यांचा प्रवास खूप चांगला राहिला आहे. तसेच यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे बिट असतात त्यांनी त्या उत्तम प्रकारे सांभाळल्या आहेत. ऍटोमोबाइल पासून लाईफस्टाईल पर्यंत किंवा बॉलीवूड यासारखे बिट त्यांनी कौशल्यपूर्ण हाताळल्या आहेत. तसेच या कामासाठी जे तंत्रज्ञान वापरावं लागतं ते सुद्धा त्या चांगल्या हाताळतात. वेगवेगळ्या विषयांचे जे मुद्दे असतात ते हर्षदा पटकन समजून घेते. त्यामुळे त्यांच्या लिखाणात कायम वैविध्य दिसतं.
गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारितेमध्ये त्यांनी अगदी मन लावून आणि छान काम केलं आहे. यामुळे हर्षदाचा या क्षेत्रातला अनुभव वाढत गेलाय आणि त्या एक्स्पर्ट झाल्या आहेत. या क्षेत्रात जसे बदल होत गेले तसे हर्षदा यांनी त्यांच्या कामात केले आहे. तसेच हर्षदा मन लावून विचारपूर्वक लिखाण करतात. जे वाचकांना आकर्षक करणार असतं, आणि चांगली माहिती देणार असतं. तसेच हर्षदा यांना नवं नवीन गोष्टी शिकण्याची आणि समजून घेण्याची प्रचंड आवड आहे.
हर्षदा बद्दल एक सांगायचं झाल्यास, या व्यावसायिक गुणांच्या व्यक्तीरिक्त हर्षदा यांना काही छंद आहेत. त्यांना फोटोग्राफी आवडते, तसेच चांगले क्षण टिपायला देखील आवडतात…. आणखी वाचा