तामिळ सुपरस्टारची रेसिंग कार पाहिलात का? फोटो व्हायरल

Prathamesh
3 Min Read

Thala Ajith Kumar Racing Car : तमिळ चित्रपटांचा सुपरस्टार Ajith Kumar आता कार रेसिंगच्या ट्रॅकवर आला आहे. आता तो पुन्हा एकदा फॉर्म्युला-1 रेसिंग ट्रॅकवर परतला आहे. यावेळी तो केवळ ट्रॅकवर आपली कार चालवताना दिसणार नाही, तर त्याची स्वतःची टीम तयार करु रेसिंग ट्रॅकवर आपली स्टाईल दाखवणार आहे. नुकताच तो आपल्या नव्या रेसिंग कारसोबत दिसला.

Thala Ajith Kumar यांच्या कार रेसिंग टीमचे नाव ‘Ajith Kumar Racing’ असे आहे. जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या ’24H Dubai Race’ मालिकेत त्याचे पुनरागमन होणार आहे. यासाठी त्याने आपल्या रेसिंग कारला पांढरा आणि लाल थीम दिला आहे. त्यावर पिवळ्या रंगाचे पट्टे आहेत. रेसिंगसाठी, त्याने Porsche GT3 RS ला आपली पसंती बनविली आहे.

Latest Pics Of THALA AJITH From the Barcelona F1 Circuit In Spain 🇪🇸
Man On a Mission! 🔥🔥🔥#Ajithkumar | #AjithkumarRacing pic.twitter.com/Jsud19VwJZ
— AJITHKUMAR FANS CLUB (@ThalaAjith_FC) November 27, 2024

गोळीच्या वेगासारखा वेग
सुपरस्टार Thala Ajith Kumar ने रेसिंगसाठी निवडलेली Porsche GT3 RS. ही कार अवघ्या 3.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडते. हे 386 किलोवॅट म्हणजेच 525 पीएस पॉवर जनरेट करते. याची टॉप स्पीड 296 किमी प्रतितास आहे. गाडीसाठी हा एक चांगला वेग आहे, कारण बुलेट ट्रेन सहसा इतक्या वेगाने धावते.
या कारचे कमर्शियल व्हर्जन 4 लीटर इंजिनसह येते. त्याचबरोबर त्याची एरोडायनॅमिक्सही भन्नाट आहे. त्यामुळेच फॉर्म्युला रेसिंगच्या ट्रॅकवर या कारला पसंती दिली जाते.
Porsche GT3 RS ची किंमत किती?
Porsche GT3 RS कारची भारतीय बाजारात किंमत 3.5 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टार Thala Ajith Kumar ने ही कार कस्टमाइज करून घेतली असून त्याची किंमत सुमारे 4 कोटी रुपये आहे.
Thala Ajith Kumar सुरुवातीच्या काळापासून मोटोस्पोर्टमध्ये भाग घेत आहेत. Ajith Kumar याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेसिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. यात फॉर्म्युला बीएमडब्ल्यू आशिया चॅम्पियनशिपचाही समावेश आहे.
Ajith Kumar चे फोटो व्हायरल
तमिळ चित्रपटांचा सुपरस्टार Ajith Kumar पुन्हा एकदा कार रेसिंगच्या दुनियेत परतला आहे. यामुळे सध्या Ajith Kumar याची चांगलीच चर्चा आहे. Ajith Kumar हा केवळ कार रेसरच नव्हे तर कार रेसिंग टीमचा मालक बनून फॉर्म्युला-1 कार रेस सर्किटवर आला आहे. Ajith Kumar च्या नव्या रेसिंग कारसोबतचे Ajith Kumar याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.


Source link

Share This Article