Bike Speed : ‘या’ स्पीडने बाईक चालवा, अतिरिक्त पेट्रोल खर्च वाचवा, ट्रिक्स वाचा

Prathamesh
2 Min Read

Bike Fuel Tank Speed: तुम्हाला तुमच्या बाईकचं पेट्रोल वाचवायचं आहे का? मग यावरच आम्ही तुम्हाला आज ट्रिक्स सांगणार आहोत. वाढती महागाई आणि अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी तुम्ही पेट्रोल वाचवण्याचा हा पर्याय अवलंबल्यास तुम्हाला महिनाभर वारंवार पेट्रोलसाठी अधिकचे पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. जाणून घ्या पेट्रोल वाचवण्याच्या टिप्स. तुम्ही बाईकच्या पेट्रोलची टँक फुल्ल करून ऑफिस किंवा कामावर जातात का? मग पेट्रोल टँक जास्तीत जास्त 20 दिवस चालू शकते. 4 ते 5 किलोमीटर असेल तर ही पेट्रोल टाकी महिनाभर टिकू शकते. पण, रोज 10 ते 20 किलोमीटर बाईक चालवणाऱ्यांची फ्यूल टँक जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस चालू शकते.

आता यावर पेट्रोल कसं वाचवायचं किंवा खर्च कसा कमी करायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर याचंच उत्तर आज आम्ही सांगणार आहोत. तुम्ही पेट्रोल वाचवण्याचे खालील पर्याय अवलंबल्यास तुम्हाला महिनाभर वारंवार पेट्रोलसाठी अधिकचे पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. जाणून घ्या पेट्रोल वाचवण्याच्या टिप्स.
इंधन बचत टिप्स

बाईकचा योग्य वेग जाणून घ्यायचा असेल तर तो ताशी 40-60 किमी आहे. बाईक या वेगाने धावत असेल तर आमच्यावर विश्वास ठेवा की बाईक सर्वात मजबूत मायलेज देते. जास्त वेग आणि वारंवार ब्रेक लावल्याने अधिक इंधनाची बचत होते. यामुळे तुम्हाला महिन्यातून अनेकवेळा इंधन भरावे लागू शकते.
गिअर शिफ्टिंगची काळजी घ्या
योग्य गिअरमध्ये बाईक चालवणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही कमी वेगाने धावत असाल तर टॉप गिअर लावणे टाळा. तुम्ही हाय स्पीडमध्ये असाल तर गिअर नेहमी टॉपवर ठेवा. नेहमी वेगानुसार बाईकचे गिअर बदलावे.
इंजिनची काळजी घ्या
बाईक वेळेवर सर्व्हिस करून घ्या आणि सर्व आवश्यक भागांवर लक्ष केंद्रित करा. गरज पडल्यास ते बदलूनही घ्या.
टायर तपासा
टायर चांगलं नसेल, गरजेपेक्षा कमी-जास्त असेल तर ते बाईकच्या इंजिनवर दबाव टाकू लागतं. यामुळे जास्त इंधन खर्च होतं आणि मग बाईकच्या मायलेजवर परिणाम होऊ शकतो.
अनावश्यक भार टाकू नका
बाईकवर विनाकारण जास्त वजन टाकू नका, असे केल्याने इंजिनवरील दबाव वाढतो आणि इंधन जास्त खर्च होते.
तुम्ही वरील या सवयींचा किंवा ट्रिक्सचा अवलंब केल्यास तुमच्या बाईकची पूर्ण टाकी बराच काळ टिकू शकते आणि तुमच्या खिशावर ओझेही पडत नाही. तसेच इंधनासाठी देखील अतिरिक्त पैसे खर्च होणार नाही.

Source link

Share This Article