कार चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स करतील मदत

Prathamesh
3 Min Read


car care tips: भारतामध्ये दरवर्षी अनेक जण कार विकत घेतात. कारच्या देखभालीबरोबच कार चोरीला जाऊ नये याची काळजी घेणेदेखील खूप महत्त्वाचे आहे. आजवर अशा अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील, ज्यात कारचालकाच्या हलगर्जीपणामुळे महागड्या कार चोरांनी एका रात्रीत लंपास केल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमची कार चोरी होण्यापासून वाचवू शकता.

दरवाजे लॉक करा

Loksatta anvyarth Ten years in jail on charges of Naxalism G N Death of Sai Baba

अन्वयार्थ: व्यवस्थारक्षणासाठी तरी मानवाधिकार राखा!

18th October 2024 Horoscope In Marathi

१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…

Bike Safety Tips

चोरांपासून बाईक सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

World Hand Wash Day, wash hands,

हात धुता धुता…

season do hair lice occur

केसातील उवा कोणत्या ऋतूमध्ये होतात? त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय…

important tips for getting a personal loan

वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी चार महत्त्वाचे सल्ले; त्वरित कर्ज घेताना कोणत्या चुका टाळाव्यात?

bike taking petrol fire

पेट्रोल भरताना बाईकचालकाच्या कोणत्या चुकीमुळे आग लागते? अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स ठरतील फायदेशीर

Shiv Sena Yuva Sena Secretary Dipesh Mhatre

शिवसेना युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांना जीवे ठार मारण्याची धमकी, फलकांवरुन जबाब देण्यासाठी शक्तिप्रदर्शन करत पोलीस ठाण्यात

बऱ्याचदा रात्रीच्या वेळी प्रवास करताना किंवा रात्री गाडी पार्क केल्यावर कार चोरीला जाण्याची शक्यता असते. अशावेळी तुमची कार चोरीला जाण्यापासून वाचवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या कारचे दरवाजे लॉक करा.

खिडक्या लॉक करा

दरवाज्यांव्यतिरिक्त खिडक्यादेखील लॉक करणे खूप गरजेचे आहे. रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्यापैकी काही जण हवा यावी यासाठी कारच्या खिडक्या उघड्या ठेवतात. मात्र, तुम्ही घाट, जंगल किंवा अज्ञात जागेवर प्रवास करत असल्यावर खिडक्या पूर्ण बंद करा.

कार सुरक्षित जागेवर पार्क करा

कार नेहमी सुरक्षित आणि योग्य ठिकाणी पार्क करा. तुमची कार जास्त लोकवस्तीच्या ठिकाणी पार्क करण्याचा प्रयत्न करा.

संरक्षण कसे करावे

स्टीयरिंग व्हील लॉक, आफ्टरमार्केट अलार्म किंवा GPS ट्रॅकिंग डिव्हाइस स्थापित करणे चोरांना कार चोरीपासून परावृत्त करू शकते आणि तुमची कार चोरीला गेल्यास ते पुनर्प्राप्त करण्यात मदत करू शकते.

सेटिंग्ज बदला

काही कार निर्माते मालकांना fob द्वारे पाठवलेले सिग्नल निष्क्रिय करण्याची परवानगी देतात. Ford, Honda आणि Audi साठी, सिग्नल बंद करण्याचा योग्य मार्ग शोधण्यासाठी मालक त्यांच्या कारची टचस्क्रीन वापरू शकतात. हे कसे करायचे याची खात्री करण्यासाठी तुमच्या कारच्या मालकाचे मॅन्युअल वाचा.

चोरीविरोधी उपकरणे वापरा

कारमध्ये अलार्म सिस्टीम वापरण्याची आणि स्टीयरिंग व्हील लॉकसारखे दृश्य चोरीविरोधी उपकरण वापरण्याची शिफारस केली जाते. जर तुमची कार अलार्म सिस्टमसह आली नसेल, तर तुम्ही नंतर एक अलार्म सिस्टम लावून घेऊ शकता.

हेही वाचा: चोरांपासून बाईक सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

कारमध्ये मौल्यवान वस्तू ठेवू नका

कारमध्ये मौल्यवान वस्तू ठेेवणे टाळा. तुमच्या कारमध्ये लॅपटॉप, फोन, टॅब्लेट किंवा इतर वस्तू पाहून चोर हमखास कारमधील गोष्टींची चोरी करू शकतो.. तुमच्या कारमध्ये मौल्यवान वस्तू कधीही ठेऊ नका किंवा हा उपाय तुम्ही करू शकत नसल्यास या वस्तू कारमध्ये पूर्णपणे लपवून ठेवा.





Source

Share This Article