प्युअर ईव्ही या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपन्यांपैकी एका कंपनीने आज इकोड्रायफिट आणि ईट्रिस्ट एक्स या त्यांच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक मोटारसायकलवर खास फेस्टिव्ह ऑफर जाहीर केली आहे.

प्युअर ईव्हीच्या प्रेडिक्टिव्ह- एआय एक्स- प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेल्या इकोड्रायफिट आणि ईट्रिस्ट एक्समध्ये आधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली असून, त्यात क्लाउड अलर्ट्स, स्मार्ट बॅटरी मॅनेजमेंट आणि कोस्टिंग रिजनरेशनसारखे ड्रायव्हिंग एड्स, हिल-असिस्ट, रिव्हर्स मोड आणि पार्क असिस्ट यांचा समावेश आहे. या मोटारसायकल्स आधुनिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खास तयार करण्यासाठी बनविण्यात आल्या असून, त्यात व्यवहार्यता आणि चांगली कामगिरी यांचा मेळ घालण्यात आला आहे.
- इकोड्रिफ्ट ही रोजच्या प्रवासासाठी बनविण्यात आलेली कार्यक्षम कॉम्युटर बाइक असून, ती वाजवी, तसेच रायडिंगचा आरामदायी अनुभव देणारी आहे.
- ईट्रिस्ट एक्स साहसाची आवड असणाऱ्यांसाठी योग्य असून, त्यात स्टाईल, दमदार अक्सलेरशन आणि १७१ किमीपर्यंतची दमदार रेंज यांचा समावेश आहे.
मर्यादित काळाची ही फेस्टिव्ह ऑफर प्युअर ईव्हीची शाश्वत वाहतुकीला चालना देण्याची बांधिलकी जपणारी असून, त्यामुळे भारतीय ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी जास्त सहजपणे उपलब्ध होणार आहे. लक्षणीय बचत शक्य करत प्युअर ईव्ही ग्राहकांना इंटर्नल कंबशन इंजिन (आयसीई) मोटारसायकल्सवरून अधिक स्वच्छ आणि हरित इलेक्ट्रिक पर्यायांकडे वळण्यास प्रोत्साहन देत आहे.
मागच्या 6 महिन्यांमध्ये या 10 गाड्यांची मार्केटमध्ये धूम; 6.13 लाखांच्या एसयूव्हीने सर्वांना टाकले मागे, वाचा सविस्तर
सणासुदीच्या या काळात प्युअर ईव्हीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. निशांत डोंगरी म्हणाले, ‘या दिवाळीत नागरिकांना प्रदूषण कमी करून पर्यावरणपूरक जीवनशैली आपलीशी करण्यासाठी प्रोत्साहन देताना आम्हाला आनंद होत आहे. सणानिमित्त आम्ही जाहीर केलेल्या खास सवलतींमुळे इलेक्ट्रिक वाहतूक जास्त सहजपणे उपलब्ध होणार असून, लक्षणीय बचतीमुळे ग्राहकांना मोठा आनंद मिळेल. प्युअर ईव्हीच्या आधुनिक वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांना शाश्वत भविष्याच्या दिशेने प्रवास करता येईल व त्याचबरोबर इलेक्ट्रिक दुचाकीची कामगिरी व सोईस्करपणा यांचा आनंद घेता येईल. आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना ‘इलेक्ट्रिक दिवाळी’च्या शुभेच्छा देतो. त्यांची दिवाळी आनंद, समृद्धी आणणारी आणि हरित भविष्याची बांधिलकी जपणारी असो.’
दिवाळी हा सण प्रकाशाची अंधारावर मात साजरा करणारा असून, प्युअर ईव्हीच्या खास ऑफर्स ग्राहकांना इलेक्ट्रिक मोटारसायकल्सच्या मदतीने अधिक स्वच्छ, प्रकाशमान भविष्य आणि या सणाच्या अविस्मरणीय आठवणी देणाऱ्या ठरतील.