West Indies Women vs New Zealand Women, 2nd Semi Final : शारजहाच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड महिला संघाने २०१६ च्या वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज महिला संघाला पराभूत केले आहे. ८ धावांनी सामना जिंकत न्यूझीलंडनं फायनल गाठली. रविवारी हा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फायनल खेळताना दिसेल. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे यंदाच्या महिला टी-२० हंगामात नवा चॅम्पियन संघ पाहायला मिळणार आहे.