Mini Fortuner Coming Soon: टोयोटा फॉर्च्युनर ही बऱ्याच काळापासून लोकांची आवडती कार आहे. आता टोयोटा मिनी फॉर्च्युनर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या कारची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा कमी असू शकते.

(वाचा)- काय सांगता! आता 18 नाहीतर वयाच्या 16 व्या वर्षी मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; करा फक्त हे काम
टोयोटा मिनी फॉर्च्युनर
टोयोटा मिनी फॉर्च्युनरला पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मसह बाजारात लाँच केले जाऊ शकते, ज्याची बॉडी आणि स्टाईल अतिशय वेगळी राहिल. टोयोटा फॉर्च्युनरची किंमत 30 लाखांपेक्षा जास्त आहे. मिनी-फॉर्च्युनर कमी किमतीत लाँच होईल अशी अपेक्षा आहे. या नवीन मिनी फॉर्च्युनरचे प्रोडक्शन या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होऊ शकते.
फूल साईजच्या एसयूव्ही विभागात टोयोटाशी स्पर्धा करण्यासाठी सध्या कोणतीही ऑटोमेकर नाही. 2020 मध्ये फोर्ड बाहेर पडल्यानंतर टोयोटा फॉर्च्युनरच्या किमतीत वाढ झाली आहे, त्यामुळे या वाहनाच्या विक्रीत घट झाली आहे. जानेवारी 2023 मध्ये या कारच्या 3,698 युनिट्सची विक्री झाली. तर सप्टेंबर 2024 मध्ये केवळ 2,473 युनिट्सची विक्री झाली.
कशी असेल मिनी फॉर्च्युनर?
मिनी फॉर्च्युनरच्या पॉवरट्रेनबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही. पण ही नवीन SUV प्यूअर पेट्रोल आणि स्ट्राँग हायब्रिडच्या ऑप्शनसह येऊ शकते. त्याच वेळी, या कारचे पूर्णपणे इलेक्ट्रिक व्हेरिएंट आगामी बाजारात देखील दस्तक देऊ शकते. मिनी फॉर्च्युनरचे पेट्रोल-हायब्रीड कॉम्बिनेशन इनोव्हा हायक्रॉसमध्ये बसवलेल्या इंजिनसारखे आढळू शकते. इनोव्हामध्ये 2.0-लिटर, 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन मजबूत हायब्रिड सिस्टमसह आहे.
(वाचा)-240 चा टॉप स्पीड; ADAS सह जबरदस्त फीचर्ससह झाली लाँच Mercedes AMG G63 Facelift, जाणून घ्या डिटेल्स
महिंद्रा स्कॉर्पिओची प्रतिस्पर्धी मिनी फॉर्च्युनर उत्तम ग्राउंड क्लिअरन्स आणि उत्कृष्ट लुकसह लाँच होऊ शकते. ही सर्व-नवीन SUV FJ Cruiser या नावाने लाँच केली जाऊ शकते. ही कार टोयोटाच्या महाराष्ट्रातील नवीन छत्रपती संभाजी नगर प्लांटमध्ये तयार केली जाऊ शकते.