BYD Seal Discount Offer: चीनी ऑटोमेकरच्या लक्झरी कार BYD सीलवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. या BYD कारच्या टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत 2 लाख रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
चिनी कार उत्पादक कंपनी BYD च्या गाडीवर डिस्काउंट देतआहे. सील ईव्हीवर 2.5 लाख रुपयांचे फायदे दिले जात आहेत. BYD सील डायनॅमिक, प्रीमियम आणि परफॉर्मन्स या तीन व्हेरिएंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. या तीन व्हेरिएंटसह, त्याच्या इलेक्ट्रिक मॉडेलवर रोख सवलत देखील उपलब्ध आहे. (वाचा)-450km रेंजसह Hyundai लाँच करणार 3 नवीन स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही! पाहा लिस्ट
BYD सील वर डिस्काउंट ऑफर
बीवायडी सीलवर 2 लाख रुपयांपर्यंत रोख सवलत दिली जात आहे. विशेषत: त्याच्या प्रीमियम व्हेरिएंटवर 50 हजार रुपयांची रोख सूट दिली जात आहे. या सणासुदीच्या हंगामात, BYD सीलच्या टॉप-स्पेक परफॉर्मन्स व्हेरिएंटची किंमत 2 लाख रुपयांनी कमी करण्यात आली आहे. ऑटोमेकरच्या इलेक्ट्रिक सेडानवरही मोठे फायदे दिले जात आहेत. या वाहनांवर 50 हजार रुपयांपर्यंतचे मेन्टेनन्स पॅकेजही उपलब्ध आहे.
BYD सील परफॉर्मेंस
BYD सीलचे अपडेटेड मॉडेल 800V प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, लक्झरी ऑटोमेकरचा दावा आहे की या गाडीचा टॉप-एंड व्हेरिएंट केवळ 3.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. या BYD कारचा टॉप स्पीड 240 kmph आहे. ही कार दोन बॅटरीच्या क्षमतेसह येते. ही कार 510 किलोमीटर ते 650 किलोमीटरची रेंज देते. (वाचा)-2 वर्षात लॉजिस्टिकचा खर्च 9 टक्क्यांनी कमी करणार; जाणून घ्या आणखी काय म्हणाले गडकरी
BYD सील किंमत
BYD सीलचा डायनॅमिक व्हेरिएंट एकाच चार्जिंगमध्ये 510 किलोमीटरची रेंज ऑफर करतो. हा व्हेरिएंट रियर व्हील ड्राइव्ह सिस्टमसह येतो. ऑफरशिवाय या कारची एक्स-शोरूम किंमत 41 लाख रुपये आहे. ही कार प्रीमियम व्हेरिएंटमध्ये 650 किलोमीटरची रेंज देते. या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 45.55 लाख रुपये आहे.
BYD सील परफॉर्मन्स व्हेरिएंटसह एका चार्जमध्ये 580 किलोमीटर अंतर कापू शकते. हे मॉडेल ऑल-व्हील ड्राइव्हच्या कार्यासह येते. या कारची एक्स-शोरूम किंमत 53 लाख रुपये आहे. (वाचा)-महिंद्रा स्कॉर्पिओची क्लासिक बॉस एडिशन लाँच, ऍक्सेसरी पॅकसह मिळेल नवीन ब्लॅक थीम
लेखकाबद्दलहर्षदा हरसोळेहर्षदा सुदर्शन हरसोळे ही हुशार आणि चांगली लेखिका आहे. गेल्या तीन वर्षांपासून हर्षदा या पत्रकारितेत चांगल आणि उत्तम काम करत आहेत. हर्षदा यांनी त्यांच्या कामाची सुरुवात प्रिंट माध्यपासून केली. व त्यांनी या मध्ये एक वेगळाच ठसा उमटवला आहे. हर्षदा यांची दृष्टी उत्सुकता असणारी आणि चौकस बुद्धीची आहे. तसेच हर्षदा या कोणतेही काम अगदी चांगल्या प्रकारे हाताळतात. यांना वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायला, आणि शिकायला आवडतं. तसेच हर्षदाचं लिखाण वैविध्यपूर्ण आहे.
प्रिंट मीडियाचं जे जग आहे त्याच्यात हर्षदा यांचा प्रवास खूप चांगला राहिला आहे. तसेच यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे बिट असतात त्यांनी त्या उत्तम प्रकारे सांभाळल्या आहेत. ऍटोमोबाइल पासून लाईफस्टाईल पर्यंत किंवा बॉलीवूड यासारखे बिट त्यांनी कौशल्यपूर्ण हाताळल्या आहेत. तसेच या कामासाठी जे तंत्रज्ञान वापरावं लागतं ते सुद्धा त्या चांगल्या हाताळतात. वेगवेगळ्या विषयांचे जे मुद्दे असतात ते हर्षदा पटकन समजून घेते. त्यामुळे त्यांच्या लिखाणात कायम वैविध्य दिसतं.
गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारितेमध्ये त्यांनी अगदी मन लावून आणि छान काम केलं आहे. यामुळे हर्षदाचा या क्षेत्रातला अनुभव वाढत गेलाय आणि त्या एक्स्पर्ट झाल्या आहेत. या क्षेत्रात जसे बदल होत गेले तसे हर्षदा यांनी त्यांच्या कामात केले आहे. तसेच हर्षदा मन लावून विचारपूर्वक लिखाण करतात. जे वाचकांना आकर्षक करणार असतं, आणि चांगली माहिती देणार असतं. तसेच हर्षदा यांना नवं नवीन गोष्टी शिकण्याची आणि समजून घेण्याची प्रचंड आवड आहे.
हर्षदा बद्दल एक सांगायचं झाल्यास, या व्यावसायिक गुणांच्या व्यक्तीरिक्त हर्षदा यांना काही छंद आहेत. त्यांना फोटोग्राफी आवडते, तसेच चांगले क्षण टिपायला देखील आवडतात…. आणखी वाचा