Royal Enfield Classic 350: Royal Enfield Classic 350 मध्ये 350cc, सिंगल-सिलेंडर, इंधन इंजेक्टेड, एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 6,100 rpm वर 20.2 bhp पॉवर प्रदान करते.
सप्टेंबर 2024 मध्ये रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 च्या 33 हजार 65 युनिट्सची विक्री झाली होती, तर ऑगस्टमध्ये बाइकच्या 28 हजार 450 युनिट्सची विक्री झाली होती. लोकांमध्ये क्लासिक 350 ची विशेष क्रेझ असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. या मोटरसायकलचे फीचर्स आणि किंमत काय आहे ते जाणून घेऊया.
(वाचा)-बजाजच्या CNG बाईकच्या विक्रीत 113 टक्के मासिक वाढ; छोट्या शहरांमध्ये बंपर मागणी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
रॉयल एनफिल्डच्या या बाईकमध्ये उत्तम फीचर्स उपलब्ध आहेत
Royal Enfield Classic 350 मध्ये 350cc, सिंगल-सिलेंडर, इंधन इंजेक्शन, एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 6,100 rpm वर 20.2 bhp ची पॉवर प्रदान करते आणि 4,000 rpm वर 27 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकची इंधन क्षमता 13 लीटर आहे. Royal Enfield Classic 350 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर त्याच्या टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 2.30 लाख रुपयांपर्यंत जाते.
अलीकडेच कंपनीने नवीन कलर व्हेरिएंट लाँच केले आहेत
यापूर्वी रॉयल एनफिल्डने ही लोकप्रिय बाईक नवीन कलर व्हेरिएंटसह लाँच केली होती. ब्रिटीश बाईक निर्मात्याने क्लासिक 350 चे पाच व्हेरिएंट सात नवीन कलरसह लाँच केले आहेत. रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 च्या हेरिटेज व्हेरिएंटमध्ये मद्रास रेड आणि जोधपूर ब्लू, हेरिटेज प्रीमियममध्ये मेडलियन ब्रॉन्झ, सिग्नल्समध्ये कमांडो सँड, गन ग्रे आणि स्टेल्थ ब्लॅक इन डार्क आणि एमराल्ड कलर स्कीम बाईकच्या क्रोम व्हेरिएंटमध्ये आणण्यात आली आहे.
(वाचा)- आकाश- ईशाची नाईट आऊट… वाढदिवसाला रोल्स रॉयसमध्ये फिरताना दिसले बहीण-भाऊ, व्हिडिओ व्हायरल
Royal Enfield Classic 350 ची स्पर्धा TVS Ronin 225, Yezdi Scrambler आणि Yezdi Roadster यांसारख्या बाईक्सशी आहे. रॉयल एनफिल्ड ही या सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय बाईक आहे.