टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज आघाडीची ग्रीन फ्यूएल रिटेलिंग व लॉजिस्टिक्स कंपनी क्लीन ग्रीन फ्यूएल अँड लॉजिस्टिक्स प्रा. लि.ला टाटा प्राइमा ५५३०.एस एलएनजी ट्रक्सच्या डिलिव्हरीजच्या शुभारंभाची घोषणा केली.
![टाटा मोटर्सची हरित गतीशीलतेच्या दिशेने वाटचाल, क्लीन ग्रीन फ्यूएल अँड लॉजिस्टिक्स प्रा. लि. ला एलएनजी-पॉवर्ड ट्रक्सच्या डिलिव्हरीचा शुभारंभ 1 114462706](https://static.langimg.com/thumb/msid-114462706,imgsize-3224543,width-700,height-394,resizemode-75/114462706.jpg)
याप्रसंगी मत व्यक्त करत क्लीन ग्रीन फ्यूएल अँड लॉजिस्टिक्स प्रा. लि.चे संचालक श्री. मिलन डोंगा म्हणाले, “दोन वर्ष जुनी स्टार्ट-अप म्हणून आम्ही लॉजिस्टिक्स उद्योगामध्ये मोठी प्रगती केली आहे आणि ग्रीन फ्यूएल स्टेशन्सच्या माध्यमातून कार्यसंचालनांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याप्रती कटिबद्ध आहोत. आमच्या ताफ्यामध्ये टाटा मोटर्सच्या प्रगत एलएनजी ट्रॅक्टर्सची भर आमच्या कार्यसंचालनांना हरित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. टाटा मोटर्स गतीशीलतेला शुद्ध व अधिक शाश्वत करण्यामध्ये, तसेच कमी खर्चिक कार्यसंचालन व प्रबळ विक्री-पश्चात्त सेवा देण्यामध्ये अग्रस्थानी आहे. या आधुनिक काळातील वेईकल्स टाटा मोटर्सचे अत्याधुनिक कनेक्टेड वेईकल प्लॅटफॉर्म फ्लीट एजसह सुसज्ज आहेत, ज्यामुळे आम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी रिअल-टाइम डेटा प्रवाह आणि स्मार्ट विश्लेषणामधून देखील फायदा होईल.”
भागीदारीवर बोलताना, टाटा मोटर्सच्या ट्रक्स विभागाचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्हणाले, “आम्हाला क्लीन ग्रीन फ्यूएल अँड लॉजिस्टिक्स प्रा. लि.ला टाटा प्राइमा ५५३०.एस एलएनजी ट्रक्सची पहिली बॅच डिलिव्हर करण्याचा आनंद होत आहे. त्यांचे लॉजिस्टिक्सला हरित व स्मार्टर करण्याचे मिशन आहे आणि आम्ही देखील या ध्येयाप्रती तितकेच कटिबद्ध आहोत. आमचे ट्रक्स प्रभावी कामगिरी, उच्च कार्यक्षमता व कमी उत्सर्जनाची खात्री देतात, जे त्यांच्या कार्यरत आवश्यकता व शाश्वतता ध्येयांशी परिपूर्णपणे संलग्न आहेत.”
टाटा प्राइमा ५५३०.एस एलएनजीमध्ये इंधन-कार्यक्षम कमिन्स ६.७ लीटर गॅस इंजिनची शक्ती आहे, जे अपवादात्मक कार्यक्षमतेसाठी २८० एचपीची शक्ती आणि ११०० एनएम टॉर्क देते. प्रबळपणे निर्माण करण्यात आलेली वेईकल रस्त्यावरील वाहतूक आणि लांब पल्ल्याच्या अंतरापर्यंत व्यावसायिक कार्यसंचालनांसाठी अनुकूल आहे. प्रीमियम प्राइमा केबिन ड्राइव्हरच्या आरामदायीपणामध्ये वाढ करते, तसेच गिअर शिफ्ट अॅडवायजर यांसारखी वैशिष्ट्ये इंधन वापर सानुकूल करतात, कार्यक्षमता सुधारतात आणि कार्यसंचालन खर्च कमी करतात. टाटा प्राइमा ५५३०.एस एलएनजी विशिष्ट कार्यसंचालन गरजांनुसार सिंगल व ड्युअल फ्यूएल क्रायोजेनिक टँक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. १००० किमीहून अधिक अंतरापर्यत रेंज देत ड्युअल टँक पर्याय विस्तारित रेंज व सुधारित कार्यरत कार्यक्षमता देते, ज्यामुळे हा ट्रक लांब पल्ल्याच्या अंतरापर्यंत कार्यसंचालनांसाठी अनुकूल आहे. तसेच, हा ट्रक कार्यक्षम ताफा व्यवस्थापनासाठी टाटा मोटर्सचा प्रमुख कनेक्टेड वेईकल प्लॅटफॉर्म फ्लीट एजसह सुसज्ज आहे, ज्यामुळे ऑपरेटर्स वेईकल्सचा अपटाइम वाढवण्यास आणि एकूण मालकीहक्क खर्च कमी करण्यास सक्षम होतात.
टाटा मोटर्स बॅटरी इलेक्ट्रिक, सीएनजी, एलएनजी, हायड्रोजन इंटर्नल कम्बशन आणि हायड्रोजन फ्यूएल सेल अशा पर्यायी इंधन तंत्रज्ञानांची शक्ती असलेले नाविन्यपूर्ण गतीशीलता सोल्यूशन्स विकसित करण्यामध्ये अग्रस्थानी आहे. कंपनीचा लहान व्यावसायिक वाहने, ट्रक्स, बसेस आणि व्हॅन्स अशा विविध विभागांमध्ये पर्यायी-इंधनची शक्ती असलेल्या व्यावसायिक वाहनांचा प्रबळ पोर्टफोलिओ आहे.