भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स अनेक सेगमेंटमध्ये वाहने विकते. मायक्रो एसयूव्ही म्हणून ऑफर केलेले टाटा पंचचे काही व्हेरिएंट काढून टाकण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने वेबसाइटवरून कोणते व्हेरिएंट क्लोज केले आहेत. जाणून घेऊ सविस्तर…
व्हेरिएंट वेबसाइटवरून काढले
टाटा पंच ही टाटा मायक्रो एसयूव्ही म्हणून ऑफर करते. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने वेबसाइटवरून SUV चे काही प्रकार काढून टाकले आहेत (Tata Punch SUV Discontinued Variants). त्यानंतर ते बंद करण्यात आल्याची शक्यता दिसत आहे. मात्र, याबाबत टाटांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, वेबसाईटवरून हटवण्यात आलेल्या प्रकारांमध्ये ॲडव्हेंचर आणि ॲडव्हेंचर रिदमचा समावेश आहे. जे पेट्रोल आणि सीएनजीसोबत आणले जातात.
Thar Roxx Waiting Period: पैसे घेऊन उभे आहेत लोक; तरीही मिळत नाहीए थार रॉक्सची डिलिव्हरी; वेटिंग पीरियड पोहचला 1.5 वर्षांपर्यंत
सप्टेंबरमध्ये करण्यात आले अपडेट
ही SUV देखील टाटा ने सप्टेंबर 2024 मध्ये अपडेट केली होती. ज्यामध्ये 10 ऑप्शन देण्यात आले होते. यामध्ये Pure, Pure (O), Adventure, Adventure Rhythm, Adventure S, Adventure+S, Accomplished +, accomplished +S, Creative + आणि Creative+S यांचा समावेश आहे.
मिळतील चांगले फीचर्स
कंपनीने आपल्या स्वस्त एसयूव्हीमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स ऑफर केले आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, मागील एसी व्हेंट्स, चार स्पीकर आणि ट्वीटरसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, पुश बटण स्टार्ट, स्टीयरिंग माउंटिंग कंट्रोल्स, ऑटो हेडलॅम्प्स, रेन सेन्सिंग वायपर्स, ड्युअल टोन कलर पर्यायांचा समावेश आहे.
इंजिनही आहे पॉवरफूल
टाटा एसयूव्हीमध्ये 1.2 लिटर क्षमतेचे रेव्होट्रॉन इंजिन देते. ज्यामध्ये पेट्रोल आणि सीएनजीचे पर्याय उपलब्ध आहेत. पेट्रोलमध्ये हे इंजिन एसयूव्हीला 87.8 पीएस पॉवर आणि 115 न्यूटन मीटरचा टॉर्क देते. तर सीएनजीमध्ये हे इंजिन एसयूव्हीला 73.5 पीएस पॉवर आणि 103 न्यूटन मीटरचा टॉर्क देते. SUV 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ऑफर केली आहे.
किंमत किती?
टाटा पंच एसयूव्हीचे अनेक व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत. त्याची एक्स-शोरूम किंमत 6.13 लाख रुपयांपासून सुरू होते आणि त्याचा टॉप व्हेरिएंट 9.60 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीवर ऑफर केला जातो.
कोणाशी करते स्पर्धा?
टाटाने पंच ही मायक्रो एसयूव्ही म्हणून आणली आहे. भारतीय बाजारपेठेत त्याची थेट स्पर्धा रेनॉ किगर, निसान मॅग्नाइट एसयूव्हीशी आहे. याशिवाय, किमतीच्या बाबतीत, मारुती बलेनो, टोयोटा ग्लान्झा, ह्युंदाई i20 यांसारख्या हॅचबॅकचे आव्हान देखील आहे.