सोनाक्षी सिन्हाने शेअर केला दबंगच्या कास्टिंगचा किस्सा: अमृताच्या लग्नात अरबाजने केले होते नोटीस

Prathamesh
3 Min Read

eod 12 1732533788
सोनाक्षी सिन्हाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात सलमान खानच्या दबंग चित्रपटातून केली होती. अलीकडेच अभिनेत्रीने सांगितले की दबंगसाठी तिची कास्टिंग कशी झाली होती. हा चित्रपट 2010 साली चित्रपटगृहात रिलीज झाला होता, आणि त्यावर्षीच्या सुपरहीट चित्रपटांत सामील झाला होता. दबंग चित्रपटाच्या प्रत्येक सीक्वेलमध्ये सोनाक्षी सिन्हामुख्य भुमिकेत दिसलेली आहे.दबंगसाठी सोनाक्षीची कास्टिंग कशी झाली?सोनाक्षी सिन्हाने करिना कपूरच्या पॉडकास्ट व्हॉट वुमन वाँट च्या सीझन 5 वर चर्चा करताना सांगितले की, सलमान खान आणि अरबाज खान यांनी मला अमृता अरोराच्या लग्नात बघितले होते. तोपर्यंत मी माझे वजनही कमी केलेले होते. अरबाज मला म्हणाला की, मी काहीतरी लिहत आहे आणि त्या भुमिकेसाठी तु एकदम परफेक्ट आहे. तेव्हा मला वाटले की तो माझ्यासोबत मस्ती करत आहे. परंतू एक दिवस तो स्क्रिप्ट ऐकवायला माझ्या घरी आला. संपुर्ण परिवारासह मी स्क्रिप्ट ऐकली. स्क्रिप्ट एैकवल्यानंतर अरबाज निघून गेला.अभिनेत्री म्हणाली, त्यानंतर मी पाहिले की मी दबंगच्या सेटवर आहे. असे वाटत होते की जसे कोणी अरेंज मॅरेंज करत आहे. परंतू जेव्हा मी सेटवर पोहोचले तेव्हा मला फिल झाले की मला हे कराय़चे आहे आणि तेव्हापासून मी हे करत आहे.सोनाक्षीने तिच्या करिअरची सुरुवात दबंग या चित्रपटातून केली होतीमी पहिल्या आठवड्यात झहीरकडे माझे प्रेम व्यक्त केले – सोनाक्षीदरम्यान सोनाक्षीने करिना कपूरशी तिच्या आणि झहीर इक्बालच्या नात्याबद्दलही केली चर्चा. अभिनेत्री आपली लव्ह स्टोरी सांगताना म्हणाली की, मी झहीरला आठवड्याभरातच आय लव यू म्हणाले होते. मी खुप उत्साहित होते. आमच्या दोघात ओळख झाली, मला काही क्लिक झाले, तुम्हाला कळते की हाच तो माणूस आहे. माझ्यासोबतही असेच काही झाले, आणि याआधी माझ्यासोबत असे कधीच झाले नव्हते. मी नेहमी माझा पूर्ण वेळ घेत असते, परंतू झहीरसोबत रिलेशनशिपमध्ये यायला मी काहिच विचार केला नाही.पती झहीर इक्बालसोबत सोनाक्षी सिन्हासात वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्नसोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाला ५ महिने झाले आहेत. 7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी यावर्षी 23 जून रोजी लग्न केले. दोघांनी स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्न केले.सोनाक्षी सिन्हा संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडी या मालिकेत दिसली होती.हिरामंडीच्या दुसऱ्या सीझनमध्येही सोनाक्षी दिसणार आहेसोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती तिच्या आगामी निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सोनाक्षीसोबतन अर्जुन रामपाल, परेश रावल आणि सुहेल नय्यरही दिसेल. यासह सोनाक्षी संजय लीला भंसाळी यांच्य़ा हिरामंडी या सिरीजच्या दुसऱ्या सीझनमध्येही दिसेल.

Source link

Share This Article