Rohit Sharma Duck On Unplayable Delivery Of Tim Southee WATCH : पुण्यातील मैदानात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाने न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला. त्यानंतर भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावाची सुरुवात केली. पण रोहित शर्माच्या रुपात टिम साउदीनं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. हिटमॅनच्या पदरी पुन्हा एकदा भोपळा आला. ९ चेंडू खेळल्यावर तो खाते न उघडता तंबूत परतला. २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर ९ वर्षांनी तो घरच्या मैदानात शून्यावर बाद झाला आहे.
Rohit Sharma clueless against Tim Southee in Pune pitch 💀
God bless him against Cummins Hazlewood Starc at MCG, Perth, Sydney pic.twitter.com/K1lefMSKDs
— Dinda Academy (@academy_dinda) October 24, 2024
साउदीनं १४ व्या वेळी कोली हिटमॅन रोहितची शिकार
भारताच्या पहिल्या डावातील तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर टिम साउदीनं रोहितला आउट केले. साउदीनं मिडल स्टंप लेंथ धरून टाकलेला चेंडू रोहित शर्मानं क्रीजमध्ये थांबून बचावात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. पण बॅटची कड घेऊन चेंडू थेट यष्टीवर जाऊन आदळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ व्या वेळी रोहित शर्मानं साउदीला आपली विकेट दिली आहे. याशिवाय कगिसो रबाडानेही रोहितला १४ वेळा तंबूत धाडले आहे. श्रीलंकेच्या अँजिलो मॅथ्यूजनं १० वेळा आणि नॅथन लायन याने ९ वेळा रोहितची विकेट घेतली आहे.
Dear Rohit Sharma,
I respect you a lot and love you but as an honest Indian cricket fan I believe you should consider giving up your opening spot for the betterment of the team. You struggle to bat in test match and pick the length so it might be better to retire with dignity🙏. pic.twitter.com/9G8MxWKmuc
— ` (@Was_divote) October 24, 2024
७ डावात फक्त एक फिफ्टी
कसोटीमध्ये भारतीय कॅप्टन रोहित शर्मा लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरताना दिसतोय. मागील ७ डावात त्याच्या भात्यातून फक्त एक अर्धशतक आले आहे. बंगळुरु कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने ५२ धावांची खेळी केली होती. ६,५,२३,८,२,५२ आणि ० अशी कामगिरीसह त्या फक्त ९६ धावा केल्याचे दिसून येते.
कॅप्टन्सीत ११ व्या वेळी पदरी पडला भोपळा
भारतीय संघाचे नेतृत्व करताना ११ व्या वेळी रोहित शर्माच्या पदरी भोपळा पडला आहे. टीम इंडियाची कॅप्टन्सी करताना सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावे आहे. १६ वेळा त्याच्यावर ही नामुष्की ओढावली होती. सौरव गांगुली संघाचे नेतृत्व करताना १३ वेळा झिरोवर आउट झाल्याचा रेकॉर्ड आहे. धोनीही रोहितप्रमाणे ११ वेळा कॅप्टन्सी करत असताना शून्यावर बाद झाला आहे.