HomeऑटोमोबाईलSalman Khan : लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खानने खरेदी केली ही बुलेट...

Salman Khan : लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खानने खरेदी केली ही बुलेट प्रुफ कार; SUV ची किंमत ऐकून व्हाल हैराण

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यानंतर लॉरेन्श बिश्नोई गँगने पुन्हा एकदा सलमान खानला धमकी दिली आहे. यापूर्वी पण काळवीट शिकार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानवर हल्ल्याची धमकी दिली आहे. तेव्हापासून सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात या धमकी सत्रानंतर सलमान खान याने एक खास बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून सलमान खान या कारचा वापर करत आहे. काय आहे या एसयुव्ही कारचे नाव आणि किती आहे तिची किंमत?

दीड वर्षांपूर्वी खरेदी केली कार

सलमान खान याने या कारसाठी मोठी रक्कम मोजली आहे. एप्रिल 2023 मध्ये ही कार त्याने दुबई येथून मागवली होती. ही एक बुलेटप्रूफ एसयुव्ही आहे. सलमान खान याच एसयुव्ही कारने मुंबईत फिरतो. Nissan Patrol SUV असे या कारचे नाव आहे. ही त्याची दुसरी बुलेटप्रूफ कार आहे. यापूर्वी तिने टोयोटा लँड क्रूझर प्राडो एसयुव्हीने फिरतो. Nissan Patrol SUV ही दुसरी एसयुव्ही सलमान खान याने दुबई येथून मागवली. 5.6-लिटर V8 पेट्रोल इंजिनची ही निसान पेट्रोल एसयूव्ही 7-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि स्टँडर्ड फोर-व्हील ड्राईव्ह सिस्टमसह मिळते.

हे सुद्धा वाचा

किती आहे या कारची किंमत?

सलमान खानची ही बुलेट प्रूफ कार Nissan Patrol भारतीय बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे या मॉडेलची किंमत किती आहे हे काही स्पष्ट नाही. ईटीच्या वृत्तानुसार, निसान पेट्रोल ही कार जवळपास 2 कोटी रुपयांच्या घरात आहे. बुलेटप्रुफिंग क्षमतेमुळे आणि इतर फीचर्समुळे या कारची किंमत वाढली आहे.

लॉरेन्स बिश्नाईने यापूर्वी पण दिली धमकी

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खान याच्यावर एक केस सुरू आहे. या प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नाईने सलमान खान याला धमकी दिली आहे. सलमान खान याला संपवणे हेच आपल्या आयुष्याचे ध्येय असल्याचे बिश्नोई यापूर्वी म्हणाला आहे. सलमान खान याचा अत्यंत जवळचा मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img