Renault Electric Motorcycle: रेनॉल्टने पॅरिस मोटर शोमध्ये नवीन रेनॉल्ट 4 ई-टेक इलेक्ट्रिक कार सादर केली. यासोबतच कंपनीने हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलर ही इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे.
अशा परिस्थितीत, आता रेनॉल्टने आपली ऑफ-रोड-ओरिएंटेड डिझाइन केलेली इलेक्ट्रिक बाईक हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलर देखील लाँच केली आहे. पण हे मॉडेल भारतात नाही तर 2024 पॅरिस मोटर शोमध्ये 4 ई-टेक इलेक्ट्रिक कारसह लाँच करण्यात आले होते.
Renault ने पॅरिस मोटर शोमध्ये नवीन Renault 4 E-Tech इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले. यासोबतच कंपनीने हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलर ही इलेक्ट्रिक बाइक सादर केली. त्याची किंमत EUR 23,340 (सुमारे 21.2 लाख रुपये) आहे. त्याची रचना स्पोर्टी आहे. यात एलईडी डीआरएलसह एक लहान एलईडी हेडलाइट युनिट आहे. याशिवाय सिंगल-पीस रिब्ड डिझाईनचे अस्सल लेदर सीट यात दिसत आहे. यात राउंडेड मिरर आहे. याशिवाय यात सीटच्या खाली एक नवीन हँडलबार, इंधन टाकी आणि बॅटरी पॅक देण्यात आला आहे. या बाईकची डिझाइन अशा प्रकारे करण्यात आली आहे की ती ऑफ-रोडवर चालवताना कोणतीही गैरसोय होणार नाही.
Car resale value: धनत्रयोदशीला जुन्या कारला मिळेल चांगली किंमत; रिसेल व्हेल्यूसाठी करा फक्त या 5 गोष्टी
उत्तम ब्रेकिंगसाठी, यात ब्रेम्बो ब्रेक कॅलिपरसह 320mm फ्रंट डिस्क आणि 240mm रियर डिस्क ब्रेक सेटअप देण्यात आला आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक बाइकला WP कडून USD टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, EMC कडील मागील मोनोशॉक युनिट आणि 17-इंच ॲल्युमिनियम वायर-स्पोक व्हील दिले आहेत, ज्यांचे डिझाइन प्रभावित करते.
फूल चार्जमध्ये 110 किलोमीटरची रेंज
हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलरमध्ये 4.8 kWh बॅटरी पॅक आहे. जे 10 bhp चा पॉवर आणि 280 Nm टॉर्क देते. कंपनीचा दावा आहे की ही बाईक एका चार्जवर 110 किलोमीटरची रेंज देते. ही बाईक दैनंदिन वापरासाठी बनवण्यात आली आहे.
रेनॉल्ट इलेक्ट्रिक बाइकबद्दल एक मनोरंजक गोष्ट म्हणजे तिचे नाव हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलर आहे. Ateliers Heritage Bikes या फ्रेंच स्टार्ट-अप कंपनीने ही बाईक बनवली आहे. ही एक लिमिटेड प्रोडक्शन इलेक्ट्रिक बाईक आहे आणि तिची प्री-ऑर्डर लवकरच सुरू केली जाऊ शकते आणि ती पुढील वर्षाच्या सुरुवातीला 2025 मध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात लाँच केली जाऊ शकते.
ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये येईल
हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलर दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, त्यापैकी एक स्टँडर्ड असेल आणि दुसरी 50 व्हर्जन असेल. त्याच्या स्टँडर्ड हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलरचा टॉप स्पीड 99 किमी/ताशी असणार आहे. त्याची किंमत सुमारे 24,950 EUR (सुमारे 22,79 लाख रुपये) असेल. पण त्याची किंमत जास्त आहे.