Nana Patekar made a revelation about Anil Kapoor replaced from ‘Parinda’अनिल कपूरचा चित्रपट परिंदा हा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाच्या सेटवर अनिल कपूर नाना पाटेकर यांना त्रास देत होते.चित्रपटसृष्टितील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी खुलासा केला की अनिक कपूरमुळे त्यांना परिंदा चित्रपटातून रिप्लेस करण्यात आले होते. यासह त्यांनी अनेक खुलासे केले. अलीकडेच नाना पाटेकर य़ांनी अनिल कपूरसोबत दिलखुलास गप्पा लारल्या. 1989 साली आलेल्या विधु विनोद चोप्रा यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या चित्रपटात जॅकी श्रॉफद्वारे रिप्लेस केल्याबद्दल त्यांनी चर्चा केली. हा बदल अनिल कपूरमुळे झाला होता, असे नाना पाटेकर यांनी सांगितले.नाना पाटेकर यांना सेटवर त्रास दिलानाना पाटेकर म्हणाले की, परिंदाच्या दरम्यान तू मला खुप त्रास दिला. मी तुम्हाला सांगतो की, मी चित्रपटात भावाची भुमिका साकारणार होतो. आम्ही रिअर्सलचीही सुरुवात केली होती. मला हटवून जॅकीला चित्रपटात अनिल कपूरमुळेच घेतले होते.पुढे ते म्हणाले, “तथापि, मी त्यांचे आभार मानू इच्छितो कारण त्यांनी जॅकीला चित्रपटात घेण्याचा आग्रह धरला नसता तर मला ‘अण्णा’ची भूमिका मिळाली नसती.”अनिल कपूर म्हणाला, मी चुकिचा असू शकतो, परंतू मला वाटले होते की परिंदामध्ये माझ्या भावाच्या भुमिकेसाठी जॅकी चांगला पर्याय असेल. ते म्हणाले की हे वैयक्तिक नव्हते, मी केवळ दिग्दर्शकांना एक सल्ला दिला होता, शेवटी निर्णय हा दिग्दर्शकांचाच होता.यावर नाना पाटेकर म्हणाले, पण तुम्ही स्टार होता, नक्कीच त्यांनी तुमचे एैकले असते. मात्र, या चित्रपटात जॅकीने चांगले काम केले. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.परिंदामध्ये अनिक कपूरसोबत जॅकी श्रॉफ आणि माधुरी दिक्षित मुख्य भुमिकेत दिसले. या चित्रपटाने दोन राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले.’मिस्टर इंडिया’ अभिनेता अनिल कपूरने ‘हम पांच’ बद्दल सांगितले. तो म्हणाला, “‘हम पांच’ चित्रपटात मी कास्टिंग डायरेक्टर होतो आणि यादरम्यान मी अनेक विचित्र गोष्टी केल्या. खरं तर मी प्रोडक्शन, कास्टिंग आणि स्टार्सना सेटवर घेऊन जात असे.अनिल कपूर गमतीशीरपणे म्हणाला, “मी चित्रपटासाठी नसीरुद्दीन शाह यांचा पाठलाग करायचो. हे सर्व मी केले आहे. ‘हम पांच’च्या कास्टिंगमध्ये माझी मोठी भूमिका होती.
Source link