जर्मन लक्झरी वाहन उत्पादक मर्सिडीजने भारतात अनेक उत्तम गाड्या ऑफर केल्या आहेत. कंपनी सतत आपला पोर्टफोलिओ सुधारत आहे आणि नवीन वाहने लाँच करत आहे.
नवीन मर्सिडीज बेंझ लाँच होणार
मर्सिडीज आपली नवीन कार म्हणून AMG C 63 S E E Engine Performance लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार 12 नोव्हेंबरला दिवाळी नंतर लाँच होईल यामध्ये उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह हायब्रीड तंत्रज्ञानही देण्यात येणार आहे.
किती पॉवरफूल इंजिन?
कंपनी या कारमध्ये दोन लिटर क्षमतेचे चार-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन (2024 Mercedes-AMG C 63 S E इंजिन) प्रदान करेल. यामुळे 475 हॉर्स पॉवर आणि 680 न्यूटन मीटर टॉर्क मिळेल. या इंजिनसह मागील माउंटेड हायब्रीड मोटर देखील असेल, जी 203 हॉर्सपॉवर निर्माण करेल. यामध्ये ऑल व्हील ड्राइव्हला 9 स्पीड मल्टी क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात येईल. हे इंजिन इतकं पॉवरफुल आहे की त्याच्या मदतीने 0-100 किमीचा वेग केवळ 3.3 सेकंदात गाठता येतो.
Diwali Car Parking Tips: फटाक्यांमुळे तुमची दिवाळी बे’कार’ होऊ देऊ नका! कार सेफ्टीसाठी फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स
कसे असणार फीचर्स
मर्सिडीज या कारमध्ये अनेक उत्तम फीचर्स देईल (2024 Mercedes-AMG C 63 S E फीचर्स). यात एलईडी लाइट्स, आक्रमकपणे डिझाइन केलेले पुढील आणि मागील बंपर, 20-इंच अलॉय व्हील, स्पोर्टी बॉडी किट, कार्बन फायबर, MBUX, AMG परफॉर्मन्स स्टीयरिंग व्हील, नवीन जनरेशनच्या AMG परफॉर्मन्स सीटसाठी पर्याय, AMG ग्राफिक्ससह ऑफर केले जाईल.
किंमत किती?
मर्सिडीज सध्या C43 ही परफॉर्मन्स लक्झरी सेडान म्हणून भारतात 98.25 लाख रुपये, एक्स-शोरूम किंमतीत ऑफर करते. परफॉर्मन्ससाठी बनवलेल्या या कारची लाँचिंगच्या वेळी समजेल. परंतु अशी अपेक्षा आहे की मर्सिडीज बेंझ भारतात सुमारे 1.5 कोटी ते 2 कोटी रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच करेल (2024 Mercedes-AMG C 63 S E किंमत भारतात). लाँच झाल्यानंतर, या कारला भारतात ऑडीच्या RS5 कडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागू शकतो.