मारुती वॅगनआर आता हायब्रिड इंजिनात येणार, किती देणार मायलेज?, केव्हा येणार? पाहा

Prathamesh
3 Min Read

मारुती कंपनीची वॅगनआर पॉप्युलर हॅचबॅक कार आहे. भारतीय बाजारात ही कार 1999 रोजी मध्ये आली होती. तेव्हापासून ही स्वस्त कार भारतीयांची पसंदीची कार आहे. आताही भारतीय बाजारात 3dr जनरेशन वॅगनआरची विक्री होत आहे. जपानमध्ये नेक्स्ट जनरेशनची वॅगनआर संपूर्णपणे हायब्रिड इंजिनासह लॉंच होऊ शकते. या कारला साल 2025 पर्यंत लॉंच केले जाऊ शकते.जर असे झाले तर वॅगनआर संपूर्णत:फुली हायब्रिड सिस्टीमने लॉंच होणारी पहिली मिनी कार ठरणार आहे. सध्याची वॅगनआरमध्ये 1.0 लीटरचे K सिरीजचे इंजिन दिले जाते. यात सीएनजीचा पर्याय देखील मिळतो.

जपानमध्ये संपूर्ण हायब्रिड वॅगनआर मध्ये इनलाईन 3 DOHC, 0.66 लिटरचे हायब्रिड इंजिन मिळण्याची शक्यता आहे. तर ICE इंजिन 54 ची पॉवर आणि 58 Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. तसेच इलेक्ट्रीक मोटर 10 PS ची पॉवर आणि 29.5 Nm ची पीक टॉर्क जनरेट करेल. हायब्रिड पावपट्रेनमध्ये इलेक्ट्रीक कंटीन्युअस वॅरिएबल ट्रान्समिशन ( eCVT ) असणार आहे.

प्रसिद्ध कॉम्पॅक्ट SUV मध्ये ग्रॅंड विटारा स्ट्रॉंग हायब्रिड 27.97 किमी / लीटरचे मायलेज देते. सध्याची वॅगनआर के 25.19 किमी / लीटर ( AGS ) आधीच चांगला आहे. अशात संपूर्णत: हायब्रिड वॅगनआर आणखी चांगल्या मायलेज साठी डिझाईन केले जात आहे. याचा मायलेज 30 किमी/ लीटर हून अधिक असू शकते. वॅगनआरच्या सीएनजी व्हेरिएंटचे मायलेज 33.47 किमी/ किलोग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

या कार देखील हायब्रिड होणार ?

भारतात मारुती कंपनीने लहान बजेट कार स्वस्तातील हायब्रिड कार सिस्टीममध्ये रुपांतर करण्याचे काम सुरु केलेले आहे. वॅगनआर ही कार 1.2 लिटरच्या 3 सिलेंडर इंजिनासोबत बाजारात येईल. वॅगनआर, स्विफ्ट, डिझायर, फ्रोंक्स सारख्या कारमध्ये देखील हायब्रिड इंजिनचा सेटअप मिळू शकतो.

संपूर्ण हायब्रिड वॅगनआरची किंमत किती ?

संपूर्ण हायब्रिड कार पेट्रोल व्हेरिएंटच्या तुलनेत महाग असते. वॅगनआर स्वस्तात असून तिची किंमत केवळ 5.55 लाख रुपयांनी सुरु होते. तर हायब्रिट व्हर्जन मात्र महाग असणार आहे. जपानमध्ये फुल्ली हायब्रिड वॅगनआरची किंमत 1.3 दशलक्ष येन ( सुमारे 7.22 लाख रुपये ) पासून सुरु होऊ शकते. वॅगनआर फुल्ली हायब्रिडच्या टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत सुमारे 1.9 दशलक्ष येन ( सुमारे 10.55 लाख रुपये ) असू शकते. भारत-स्पेक वॅगनआरचे टॉप-स्पेक व्हेरिएंट (ZXI+ AGS) 7.21 लाख रुपये सुरुवातीच्या किंमती उपलब्ध आहे.तर CNG व्हेरिएंट 6.45 लाख रुपये ते 6.90 लाख रुपये या किंमतीवर मिळत आहे.

Source link

Share This Article