Maruti Wagon R आता हायब्रिड इंजिनात येणार, किती देणार मायलेज?, केव्हा येणार? पाहा

Prathamesh
2 Min Read

मारुती कंपनीची Wagon R भारतीय बाजारात एक लोकप्रिय हॅचबॅक कार आहे, जी 1999 मध्ये प्रथम लाँच झाली होती. तिच्या स्वस्त आणि उपयुक्ततेमुळे ती अनेक भारतीयांची आवडती कार ठरली आहे. सध्या भारतीय बाजारात वॅगनआरचे तिसरे जनरेशन उपलब्ध आहे.

तथापि, जपानमध्ये या कारचा पुढील जनरेशन संपूर्ण हायब्रिड इंजिनासह लाँच करण्याची योजना आहे. असे अपेक्षित आहे की ही हायब्रिड Maruti Wagon R 2025 पर्यंत उपलब्ध होईल.

अशा प्रकारे, फुली हायब्रिड सिस्टीमसह लाँच होणारी वॅगनआर ही पहिली मिनी कार ठरू शकते. सध्याच्या Maruti Wagon R 1.0 लीटरचे K-सिरीजचे इंजिन आहे, ज्यामध्ये सीएनजीचा पर्याय देखील आहे.

जपानमध्ये लॉंच होणाऱ्या हायब्रिड वॅगनआरमध्ये इनलाइन 3 DOHC, 0.66 लिटरचे हायब्रिड इंजिन असू शकते. हे इंजिन 54 पीएस पॉवर आणि 58 Nm पीक टॉर्क जनरेट करेल, तर इलेक्ट्रिक मोटर 10 पीएस पॉवर आणि 29.5 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. हायब्रिड पॉवरट्रेनमध्ये इलेक्ट्रिक कंटीन्युअस वॅरिएबल ट्रान्समिशन (eCVT) असण्याची शक्यता आहे.

सध्या ग्रँड विटारा सारखी कॉम्पॅक्ट SUV स्ट्रॉंग हायब्रिड सिस्टीमसह 27.97 किमी/लीटर मायलेज देते, तर सध्याची वॅगनआर AGS 25.19 किमी/लीटरचा मायलेज देते.

संपूर्ण हायब्रिड वॅगनआरच्या मायलेज 30 किमी/लीटरपेक्षा अधिक असू शकतो. तसेच, वॅगनआर सीएनजी व्हेरिएंट 33.47 किमी/किलो मायलेज देतो.

भारतात, मारुती लहान बजेट कारमध्ये हायब्रिड तंत्रज्ञान आणण्याचे प्रयत्न करत आहे. भविष्यात वॅगनआर, स्विफ्ट, डिझायर आणि फ्रोंक्ससारख्या गाड्यांमध्ये हायब्रिड इंजिन उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

जपानमध्ये संपूर्ण हायब्रिड वॅगनआरची किंमत अंदाजे 1.3 दशलक्ष येन (सुमारे 7.22 लाख रुपये) पासून सुरू होऊ शकते, तर टॉप-स्पेक व्हेरिएंट 1.9 दशलक्ष येन (सुमारे 10.55 लाख रुपये) पर्यंत जाऊ शकते.

Share This Article