Kunal Kamra Ola Electric Twitter feud: ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल आणि कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यात सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. कामरा यांनी कंपनीच्या ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारी आणि रिफंड पॉलिसीवर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि सार्वजनिक योजनेची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी कामराने ओलाच्या सर्व्हिसबद्द्ल भाष्य केले होते, त्यानंतर कंपनीचे सीईओ भावीश अग्रवाल आणि कुणाल कामरा यांच्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर जोरदार वाद झाला होता. कुणाल कामरा यांनी ओला इलेक्ट्रिकच्या S1 सीरिजमधील स्कूटरच्या सर्व्हिसवर टीका करण्यास सुरुवात केली आणि ओलाच्या अनेक स्कूटर डीलरशिपवर धूळ जमा असल्याचा फोटो पोस्ट केला. हे सर्व भारतीय ग्राहकांनी सहन करायचे का, असा सवाल कुणाल यांनी केला त्यावेळी केला होता.
काय म्हणाले भाविश अग्रवाल?
यानंतर भाविश अग्रवाल यांनी कामरा यांच्या ट्विटवर रिप्लाय करुन सांगतिले की, यापेक्षा जास्त पैसे मी देऊ शकतो. भाविश अग्रवाल यांनी असेही लिहिले आहे की ओला आपले सेवा नेटवर्क वाढवण्यासाठी आणि बॅकलॉक बाहेर काढण्याचे काम करत आहे. यावर कामरा यांनी लिहिले की, कंपनी ओलाचे ग्राहक असलेल्यांना 100 टक्के परतावा देत नाही, तर जे ग्राहक नाहीत त्यांना पैसे देण्यास सांगत आहेत.
450km रेंजसह Hyundai लाँच करणार 3 नवीन स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही! पाहा लिस्ट
युजर्स करत आहे कामरा यांच्या नवीन ट्विटवर अग्रवाल यांचा रिप्लाय
कामराने ओला इलेक्ट्रिकवर पुन्हा निशाणा साधल्यानंतर युजर्स भाविश अग्रवालच्या उत्तराची वाट पाहत आहेत आणि यासंदर्भात फेसबुकवर अनेक मीम्सही शेअर केले जात आहेत. ओला इलेक्ट्रिकच्या सेवेबाबत सतत तक्रारी येत असल्याने अवजड उद्योग मंत्रालयाने ओला इलेक्ट्रिकच्या सेवा केंद्रांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीविरोधात 10,000 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI), अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत चाचणी आणि प्रमाणन एजन्सीला ऑडिट करण्यास सांगितले आहे. लेखापरीक्षणानंतर सरकार पुढील कार्यवाही ठरवेल.
ओला इलेक्ट्रिकविरुद्ध आल्या तक्रारी
यापूर्वी असे वृत्त होते की राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर 10000 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने ओला इलेक्ट्रिकला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रोडक्शनमधील प्रॉब्लेम,cancel बुकिंग केल्यावर आंशिक किंवा झीरो रिफंड, सर्व्हिसिंग असूनही प्रॉब्लेम कायम असणे, ओव्हरचार्जिंग, इन्व्हॉइसमधील त्रुटी, बॅटरी आणि वाहनातील एलिसमेंटशी संबंधित विविध समस्यांबाबत ग्राहकांनी ओला इलेक्ट्रिकविरुद्ध तक्रारी केल्या आहेत.