IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; “टीम इंडिया है तो मुमकिन है”

Prathamesh
4 Min Read


India vs New Zealand, 1st Test; New Zealand needs 107 runs to win after India all out for 462 :  बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघाचा डाव ४६२ धावांत आटोपला. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर १०७ धावांचे टार्गेट सेट केले आहे. चौथ्या दिवशी भारतीय संघाचा डाव संपल्यावर न्यूझीलंडचा संघ बॅटिंगसाठी मैदानात उतरला. पण अंधूक प्रकाशामुळे ४ चेंडूनंतरच खेळ थांबवण्यात आला. काही वेळातच जोरदार पावसालाही सुरुवात झाली आणि चौथ्या दिवसाचा खेळच थांबला.

IND vs NZ कसोटी सामन्याचा निकाल लागणार की, पाऊसाची बॅटिंग पाहायला मिळणार?

न्यूझीलंडसमोरील आव्हान फार कमी वाटत असले तरी ते आव्हान सोपे नाही. धावसंख्या पाहिल्यानंतर सामना न्यूझीलंडच्या बाजूनं झुकलाय असे वाटणे स्वभाविक आहे. पण पाऊस पडल्यानंतर पुन्हा परिस्थिती भारताच्या बाजूनं होऊ शकते. पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय फलंदाजीची जी अवस्था झाली तशी वेळ न्यूझीलंडच्या संघातील फलंदाजांवरही येऊ शकते. अखेरच्या दिवशी निकाल लागला तर तो कुणाच्या बाजूनं लागणार?  पावसामुळे सामना अनिर्णित राहणार का? असे अनेक प्रश्न सध्या क्रिकेट चाहत्यांना पडू शकतात. 

 कमी धावसंख्येचा बचाव करतानाही टीम इंडियाने जिंकून दाखवलीये कसोटी

अखेरच्या दिवशी निकाल लागणार की, पावसामुळे सामना अनिर्णित राहणार असं एक वेगळ ट्विस्ट निर्माण झाले आहे. भारतीय संघाचे काही चाहते तर पावसाची बॅटिंग अशीच सुरु रहावी, अशी प्रार्थना करत असतील. कारण भारतीय संघाने दिलेले टार्गेट खूपच अल्प आहे. पण तुम्हाला माहितीये का? भारतीय संघाने घरच्या मैदानात कमी धावसंख्येचा बचाव करत कसोटी जिंकून दाखवलीये? चला तर मग नजर टाकुयात टीम इंडियाने कमी धावसंख्येचा बचाव करत कसोटी सामना जिंकल्याच्या खास रेकॉर्ड्सवर

१०७ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मुंबई (नोव्हेंबर २००४)

मुंबईच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला १०७ धावा काढू दिल्या नव्हत्या. हरभजन सिंग, अनिल कुंबळे आणि मुलरी कार्तिक या फिरकीपटूंच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन संघाने गुडघे टेकले होते. १०७ धावांचा पाठलाग कांगारूंचा संघ ९३ धावांत आटोपला होता. भारतीय संघाने हा सामना १३ धावांनी जिंकला होता.

१४३ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न, फेब्रुवारी १९८१

कमी धावसंख्येचा बचाव करताना परदेशातील कसोटी सामन्याचाही समावेश आहे. १९८१ मध्ये मेलबर्नच्या मैदानात भारतीय संघाने १४३ धावांचा बचाव करत कसोटी सामना जिंकून दाखवला होता. कपिल देव यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला अवघ्या ८३ धावांवर ऑल आउट करत ५९ धावांनी विजय नोंदवला होता. कपिल पाजींनी या सामन्यात २८ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या होत्या.

१७० धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अहमदाबाद नोव्हेंबर १९९६

जवागल श्रीनाथ यांनी २१ धावा खर्च करून ६ विकेट्स मिळवलेल्या या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला १०५ धावांवर रोखत कसोटी सामना ६४ धावांनी जिंकला होता. 

१८८ धावा विरुद्ध न्यूझीलंड, मुंबई, सप्टेंबर १९६९

कमी धावसंख्येचा बचाव करताना भारतीय संघाने न्यूझीलंडलाही मात दिली आहे. १९६९ मध्ये  १८८ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १२७ धावांत आटोपला होता.  

१८८ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बंगळुरु मार्च २०१७

बंगळुरुच्या मैदानात १८८ धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला टीम इंडियान ११२ धावांवर रोखत कसोटी सामना जिंकून दाखवला होता. या सामन्यातील हिरो आजही टीम इंडियाच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाज आहे. रविचंद्रन अश्विन याने या सामन्यात ६ विकेट्स घेतल्या होत्या.  

Web Title: IND vs NZ 1st Test New Zealand needs 107 runs to win after India all out for 462 Know Record Of 5 Lowest Targets Defended by India In Test History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.



Source

Share This Article