जपानी ऑटोमोबाईल उत्पादक Honda भारतीय बाजारपेठेत सेडान आणि SUV सेगमेंटमध्ये वाहने ऑफर करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने अलीकडेच आपल्या हजारो कार परत मागवल्या आहेत. कंपनीने कोणत्या गाड्या परत मागवल्या आहेत? हे आपण जाणून घेऊया सविस्तर…
होंडाने रिकॉल जारी केले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जपानी ऑटोमेकर होंडा मोटर्सने आपल्या वाहनांमधील खराबीची माहिती मिळाल्यानंतर हजारो युनिट्स परत मागवल्या आहेत. माहितीनुसार, कंपनीने 92672 युनिट्ससाठी रिकॉल जारी केले आहे. यापैकी 90468 युनिट्समध्ये हा दोष आढळून आला आहे, परंतु कंपनी 2204 इतर जुन्या गाड्या परत मागवून त्यांचे पार्ट बदलणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, कंपनीला त्यांच्या कारच्या इंधन पंपमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर हजारो युनिट्सना परत बोलावण्यात आले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ज्या गाड्यांसाठी रिकॉल जारी करण्यात आले आहे त्यांच्या इंधन पंपामध्ये दोषपूर्ण प्रोपेलर असू शकतात ज्यामुळे इंजिन बंद होऊ शकते किंवा ते सुरू करण्यात अडचण येऊ शकते.
5-स्टार सेफ्टी! CNG मायलेज; आता मिळेल पॅनोरॅमिक सनरूफही, किंमत फक्त एवढी
कोणत्या गाड्या परत मागवल्या
Honda City, Honda Amaze, Honda Brio, Honda BR V, Honda CR V, Honda Accord, Honda Jazz साठी कंपनीने रिकॉल जारी केले आहे. याशिवाय, नवीन Honda Elevate आणि बंद झालेल्या Honda Mobilio साठी हे रिकॉल जारी करण्यात आलेले नाही. या सर्व कार सप्टेंबर 2017 ते जून 2018 दरम्यान तयार करण्यात आल्या होत्या.
कधी ठिक होणार कार
माहितीनुसार, दिवाळी 2024 नंतर 5 नोव्हेंबर 2024 पासून या गाड्या दुरुस्त करण्यासाठी कंपनीला बोलावले जाईल. यासाठी वाहनधारकांना ई-मेल, फोन, एसएमएस आदींद्वारे माहिती दिली जात आहे.
सर्व्हिस सेंटरमध्ये होणार ठिक
कंपनीकडून रिकॉलची माहिती मिळाल्यावर, वाहनधारकांना त्यांची कार जवळच्या सर्व्हिस सेंटरमध्ये न्यावी लागेल. ही खराबी फ्रीमध्ये दुरुस्त केली जाईल जर तुमच्याकडेही होंडा कार असेल आणि अद्याप कंपनीकडून त्याबद्दल माहिती मिळाली नसेल, तर तुम्ही स्वतः होंडाच्या वेबसाइटवर जाऊन VIN द्वारे माहिती मिळवू शकता. याशिवाय जवळच्या सर्व्हिस सेंटर किंवा शोरूमला भेट देऊनही ही माहिती मिळवता येईल.