HomeऑटोमोबाईलOla, Ather पासून TVS पर्यंत या कंपन्या किती वर्षांची बॅटरी वॉरंटी देतात?...

Ola, Ather पासून TVS पर्यंत या कंपन्या किती वर्षांची बॅटरी वॉरंटी देतात? वाचा बातमी

Ather Electric Scooter Battery Warranty: जर तुम्ही या सणासुदीच्या हंगामात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणार असाल, तर तुमच्याकडे स्कूटरबद्दल काही महत्त्वाची माहिती असली पाहिजे. इलेक्ट्रिक व्हीलमध्ये बॅटरी हा सर्वात महाग पार्ट आहे, म्हणून पैसे भरण्यापूर्वी, निश्चितपणे बॅटरी वॉरंटीशी संबंधित तपशील विचारा.

इलेक्ट्रिक स्कूटरची मागणीत वाढ

बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे, जर तुम्हीही या सणासुदीच्या हंगामात नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम तुमच्याकडे स्कूटरच्या बॅटरीशी संबंधित महत्त्वाची माहिती असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिक वाहनांमधील सर्वात महाग पार्ट म्हणजे बॅटरी. Ola, Ather आणि TVS सारख्या बाजारात अनेक कंपन्या आहेत ज्या ग्राहकांना चांगल्या इलेक्ट्रिक उपलब्ध करुन देतात.

image

बॅटरी जितकी सुरक्षित आणि अधिक पॉवरफूल असेल तितकी चांगली ड्रायव्हिंग रेंज तुम्हाला स्कूटरसोबत मिळेल. नवीन इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्यापूर्वी, तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की तुम्ही खरेदी करत असलेल्या स्कूटरमध्ये दिलेल्या बॅटरीची वॉरंटी काय आहे?

इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी वॉरंटी: तुम्हाला बॅटरीची किती वॉरंटी मिळेल हे जाणून घ्या?

ओला स्कूटर: जर तुम्ही ओला इलेक्ट्रिककडून नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला कंपनीकडून 8 वर्षे/80,000 किमी पर्यंतच्या वॉरंटीचा लाभ मिळेल.

Ather स्कूटर: Ather कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरवर 3 वर्षे/30,000 किमी पर्यंतची वॉरंटी देते. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही Ather Battery Protect Plan स्वतंत्रपणे खरेदी करू शकता आणि बॅटरीची वॉरंटी 5 वर्षे/60,000 किमी पर्यंत वाढवू शकता.

TVS स्कूटर: TVS कंपनीकडे इलेक्ट्रिक स्कूटर देखील आहे जी कंपनीचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. या स्कूटरचे नाव TVS iQube आहे, ही इलेक्ट्रिक स्कूटर 3 वर्षे/50,000 किमी पर्यंतच्या वॉरंटीसह येते. स्कूटर खरेदी करताना तुम्ही एक्सटेंडेड वॉरंटी घेतल्यास, तुम्हाला 5 वर्षे/70,000 किमी पर्यंत बॅटरी वॉरंटीचा लाभ मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img