HomeऑटोमोबाईलDiwali Offer : या इलेक्ट्रिक बाइक्सवर 20 हजार रुपये डिस्काऊंट, फुल चार्जमध्ये...

Diwali Offer : या इलेक्ट्रिक बाइक्सवर 20 हजार रुपये डिस्काऊंट, फुल चार्जमध्ये पळणार 171km

Electric Two Wheeler बनवणारी कंपनी Pure EV ची फेस्टिव सीजनमध्ये चर्चा असणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर बहुतांश ऑटो कंपन्या ग्राहकांसाठी फेस्टिव सीजन ऑफर घेऊन येतात. Pure EV ने ग्राहकांना Electric Bikes वर 20 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट दिला आहे. ग्राहकांना ecoDryft आणि eTryst X मॉडल्सवर डिस्काऊंटचा फायदा मिळेल. या दोन बाइक्सची किंमत किती आहे? जाणून घेऊया. या बाइक्स फुल चार्जमध्ये किती किलोमीटरची ड्रायविंग रेंज ऑफर करतात आणि या ऑफरचा फायदा तुम्हाला कधीपर्यंत मिळेल.

Pure EV ecoDryft Price

80kmph टॉप स्पीड असलेल्या बाइकमध्ये 3kWh बॅटरी देण्यात आलीय. फुल चार्जमध्ये ही बाईक 151 किलोमीटर पर्यंत पळते. त्या शिवाय बॅटरीला फुल चार्ज व्हायला 6 तास वेळ लागतो. या इलेक्ट्रिक बाइकमध्ये थ्रिल, ड्राइव आणि क्रॉस ओवर असे तीन रायडिंग मोड्स देण्यात आलेत. या बाइकची किंमत 1,19,999 रुपये (एक्स शोरूम) पासून सुरु होते. आता 20 हजार रुपये डिस्काऊंट नंतर या बाइकची किंमत 99,999 रुपये (एक्स शोरूम) होणार आहे.

Pure EV eTryst X Price

94kmph टॉप स्पीडवाल्या या बाइकवर फुल चार्जमध्ये 171km ची ड्राइविंग रेंज मिळेल. या बाइकची बॅटरी फुल चार्जव्हायला 6 तासांचा वेळ लागतो. या बाइकची किंमत 1,49,999 रुपये (एक्स शोरूम) आहे. आता 20 हजार रुपये डिस्काऊंटनंतर या मॉडलची किंमत 1,29,999 रुपये (एक्स शोरूम) आहे. में ही बाइक तुम्हाला क्रॉस ओवर, ड्राइव आणि थ्रिल तीन रायडिंग मोड्समध्ये मिळेल.

ऑफरचा फायदा कधीपर्यंत?

या इलेक्ट्रिक बाइक्सवर मिळणाऱ्या ऑफरचा फायदा तुम्हाला दिवाळीच्या नंतरही मिळू शकतो. ही ऑफर 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

Source link

Must Read

spot_img