Dhanteras 2024: धनत्रयोदशीला खरेदी करा 5.32 लाखांच्या या 7-सीटर कार; मिळेल 27 चा मायलेज

Prathamesh
6 Min Read

Dhanteras 2024 affordable 7 seater cars: जर तुमच्या कुटुंबात 6-7 लोक असतील आणि तुम्ही धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर परवडणारी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला देशात उपलब्ध असलेल्या कार्स बद्दल सांगणार आहोत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम114676178

धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर जर तुम्ही कमी बजेटमध्ये नवीन 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला कार ठरावीक कार्सबद्दल सांगणार आहोत. ज्या उत्तम तर राहतीलच पण बजेटमध्येही असतील.

रेनॉल्ट ट्रायबर
किंमत: 5.99 लाख रुपयांपासून सुरू
7-सीटर कार

Renault Triber हा देखील चांगला पर्याय आहे. यामध्ये स्पेसची अडचण नाही. ही एक स्टायलिश 7 सीटर कार आहे ज्याची किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 5+2 सीटिंगचा पर्याय आहे. तसेच यामध्ये 5 मोठे व 5 छोटे लोक सहज बसू शकतात. या कारमध्ये 999cc पेट्रोल इंजिन आहे, जे 72 पीएस पॉवर आणि 96 एनएम टॉर्क देते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. ट्रायबर मायलेज 20 kmpl आहे. सुरक्षेसाठी, यात ड्युअल एअरबॅग्ज आणि EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आहे. फीचर्सबद्दल बोलायचे तर, कारमध्ये 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी Apple कार प्ले आणि Android Auto शी कनेक्ट होऊ शकते.

मारुती सुझुकी Eeco
किंमत: 5.32 लाख रुपयांपासून सुरू
7 सीटर कार

आता परवडणारी 7 सीटर कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्ही मारुती सुझुकी Eeco 5.32 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत घरी आणू शकता. Eeco मध्ये 7 सीटरचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये स्पेसची अडचण नाही. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 1.2L लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 81 PS पॉवर आणि 104 Nm टॉर्क देते. त्यात अजूनही सीएनजीचा पर्याय देण्यात आला आहे. पेट्रोल मोडवर ही कार 20 kmpl चा मायलेज देते तर CNG मोडवर ती 27 km/kg मायलेज देते.

सीएनजी टँक असूनही बूट स्पेसही यात चांगली आहे. त्याचे इंजिन बरेच विश्वासार्ह आहे. प्रत्येक वाहन सर्व हवामान परिस्थितीत चांगली कामगिरी करते. यात चांगली स्पेस देखील आहे ज्यामुळे तुम्ही त्यात भरपूर सामान ठेवू शकता. शहर आणि महामार्ग, ही कार Eeco साठी निराश होण्याची संधी देत नाही, यात ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, चाइल्ड लॉक, स्लाइडिंग दरवाजे, ड्रायव्हर आणि पॅसेंजर साइड एअरबॅग्ज आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखी फीचर आहेत.

maharashtra timesखराबी निघताच होंडाने भारतातील 90 हजारांहून अधिक वाहने मागवली परत; कार मोफत होणार दुरुस्त
मारुती सुझुकी एर्टिगा
किंमत: 8,69 लाख रुपयांपासून सुरू
7 सीटर कार

मारुती सुझुकी एर्टिगा ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. यामध्ये सेप्सची कमतरता नाही. 7 लोक कंफर्ट बसू शकतात. तुम्हाला त्याच्या बूटमध्येही भरपूर स्पेस मिळते. त्याची बिल्ड क्वालिटी देखील ठोस आहे. एर्टिगा ही सध्या देशातील सर्वात विश्वासार्ह फॅमिली कार बनली आहे. यात 1.5-लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 102 bhp पॉवर आणि 136.8Nm टॉर्क जनरेट करते. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. त्यात सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. पेट्रोल मोडवर ते 20.51kmpl मायलेज देते तर CNG वर ते 26 km/kg मायलेज देते.

EBD, ड्युअल एअरबॅग्ज, सीट बेल्ट रिमाइंडर, सीट बेल्ट प्री-टेन्शनर, लोड लिमिटर आणि मागील पार्किंग कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये Ertiga मध्ये उपलब्ध आहेत. पण हे कुटुंबासाठी अजिबात सुरक्षित नाही. नुकत्याच झालेल्या ग्लोबल NCAP टेस्टिंगमध्ये, Ertiga ला फक्त एक स्टार रेटिंग मिळाले आहे. सेफर कार्स फॉर आफ्रिका मोहिमेअंतर्गत ही क्रॅश टेस्टिंग करण्यात आली. Ertiga ची किंमत 8.69 लाख रुपयांपासून सुरू होते.

हर्षदा हरसोळे

लेखकाबद्दलहर्षदा हरसोळेहर्षदा सुदर्शन हरसोळे ही हुशार आणि चांगली लेखिका आहे. गेल्या तीन वर्षांपासून हर्षदा या पत्रकारितेत चांगल आणि उत्तम काम करत आहेत. हर्षदा यांनी त्यांच्या कामाची सुरुवात प्रिंट माध्यपासून केली. व त्यांनी या मध्ये एक वेगळाच ठसा उमटवला आहे. हर्षदा यांची दृष्टी उत्सुकता असणारी आणि चौकस बुद्धीची आहे. तसेच हर्षदा या कोणतेही काम अगदी चांगल्या प्रकारे हाताळतात. यांना वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायला, आणि शिकायला आवडतं. तसेच हर्षदाचं लिखाण वैविध्यपूर्ण आहे.

प्रिंट मीडियाचं जे जग आहे त्याच्यात हर्षदा यांचा प्रवास खूप चांगला राहिला आहे. तसेच यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे बिट असतात त्यांनी त्या उत्तम प्रकारे सांभाळल्या आहेत. ऍटोमोबाइल पासून लाईफस्टाईल पर्यंत किंवा बॉलीवूड यासारखे बिट त्यांनी कौशल्यपूर्ण हाताळल्या आहेत. तसेच या कामासाठी जे तंत्रज्ञान वापरावं लागतं ते सुद्धा त्या चांगल्या हाताळतात. वेगवेगळ्या विषयांचे जे मुद्दे असतात ते हर्षदा पटकन समजून घेते. त्यामुळे त्यांच्या लिखाणात कायम वैविध्य दिसतं.

गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारितेमध्ये त्यांनी अगदी मन लावून आणि छान काम केलं आहे. यामुळे हर्षदाचा या क्षेत्रातला अनुभव वाढत गेलाय आणि त्या एक्स्पर्ट झाल्या आहेत. या क्षेत्रात जसे बदल होत गेले तसे हर्षदा यांनी त्यांच्या कामात केले आहे. तसेच हर्षदा मन लावून विचारपूर्वक लिखाण करतात. जे वाचकांना आकर्षक करणार असतं, आणि चांगली माहिती देणार असतं. तसेच हर्षदा यांना नवं नवीन गोष्टी शिकण्याची आणि समजून घेण्याची प्रचंड आवड आहे.

हर्षदा बद्दल एक सांगायचं झाल्यास, या व्यावसायिक गुणांच्या व्यक्तीरिक्त हर्षदा यांना काही छंद आहेत. त्यांना फोटोग्राफी आवडते, तसेच चांगले क्षण टिपायला देखील आवडतात…. आणखी वाचा

Source

Share This Article