Bharat Mobility 2025 shedule date: वाहन उत्पादकांसाठी भारत सातत्याने मोठी बाजारपेठ बनत आहे. ही बाब लक्षात घेऊन भारत मोबिलिटीचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी 2025 मध्ये होणारा हा कार्यक्रम (भारत मोबिलिटी 2025 लोकेशन्स) कुठे होणार आहे? या कार्यक्रमात किती कंपन्या सहभागी होऊ शकतात? हे आपण जाणून घेऊया.
कधी होणार आयोजन?
इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो पुढील वर्षी आयोजित केला जाईल. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
कुठे होणार आयोजन?
भारत मोबिलिटी एक्पो 2025 लोकशनबद्दल सरकारने सांगितले आहे की, हा प्रोग्रॅम दिल्लीत भारत मंडपम, द्वारकामधील यशोभूमी आणि ग्रेटर नोएडामधील इंडिया एक्सपो सेंटर आणि मार्ट अशा 3 ठिकाणी होईल.
भारत मोबिलिटी 2025 चा मुख्य कार्यक्रम दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे. 17 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान येथे ऑटो एक्स्पो 2025 चे आयोजन केले जाईल. याशिवाय येथे इंडिया इंटरनॅशनल टायर शो, इंडिया सायकल शो, भारत बॅटरी शो, स्टील पॅव्हेलियन आणि मोबिलिटी टेक पॅव्हेलियनचे आयोजन करण्यात येणार आहे.
एप्रिलिया RS 457 वर फेस्टिव्हल डिस्काउंट; ऑफर फक्त 31 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध
यशोभूमी येथे कंपोनेंट शो चे होणार आयोजन
भारत मोबिलिटी 2025 चे आयोजन द्वारका, दिल्ली येथे देखील केले जाईल. 18 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान येथे हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. ज्यामध्ये कंपोनेंट शो आयोजित केला जाईल.
ग्रेटर नोएडा येथेही कार्यक्रम होणार आहे
हाच कार्यक्रम इंडिया एक्स्पो मार्ट, ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथे 19 ते 22 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित केला जाईल. ग्रेटर नोएडा येथे इंडिया कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट एक्स्पो आणि अर्बन मोबिलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर शोचे आयोजन केले जाईल.
कोणत्या कंपन्यांचा असेल सहभाग
ऑटो एक्स्पो 2025 मध्ये व्यावसायिक वाहने, इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहने, प्रवासी वाहने, तीन चाकी, दुचाकी, मिल्ट्री वाहने, एग्रीकल्चरल वाहने प्रदर्शित केली जातील. या काळात अनेक वाहनेही लाँच होणार आहेत. अशा परिस्थितीत मारुती, ह्युंदाई, टाटा, किआ, होंडा, टोयोटा, एमजी, मर्सिडीज बेंझ, ऑडी, व्होल्वो, बीएमडब्ल्यू, बजाज, एथर, हिरो मोटोकॉर्प, टीव्हीएस, रॉयल एनफिल्ड ओला, अशोक लेलँड, यासह अनेकांना अपेक्षित आहे. यामध्ये जेसीबी उत्पादकांचा सहभाग असेल.