रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहे. रिलायन्स समूहाचे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये उद्योग आहेत. रिलायन्स टेलिकम्युनिकेशन, पेट्रोल, ऑयल रिफाइनरी, रिटेल असे वेगवेगळे उद्योग रिलायन्सचे आहे. परंतु रिलायन्सचे कार दिसत नाही. मुकेश अंबानी अनेक मोठ्या सेक्टरमध्ये असताना ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये का नाही? रिलायन्ससारखी टॉप कंपनी कार का विकत नाही?
रिलायन्सचा मेन फोकस एनर्जी, पेट्रोकेमिकल, टेलीकॉमसारखे सेक्टर राहिले आहे. त्यातील अनेक व्यवसायात रिलायन्स सरळ कॉर्पोरेट क्षेत्रात डील करते. फक्त रिटेल अन् टेलिकॉममध्ये रिलायन्स सरळ ग्राहकांपर्यंत जाते.
B2B व्यवसाय
रिलायन्सचे मॉडल बिजनेस-टू-बिजनेस म्हणजेच B2B आहे. या पद्धतीच्या व्यवसायात सरळ ग्राहकांचा संबंध येत नाही. जिओ आणि रिलायन्स स्टोअर्स वगळता रिलायन्सचे सर्व उद्योग B2B आहे. परंतु कार विकण्याचा व्यवसाय B2C म्हणजे थेट ग्राहकांशी संबंधित असणार आहे.
हे सुद्धा वाचा

भगवान श्रीकृष्णसंदर्भातील या सोप्या प्रश्नांची उत्तरे देताना ‘बाल संत’ अभिनव अरोडाची भंबेरी, दिली चुकीची उत्तरे

देशातील सर्वात महाग शेअर MRF नाही, 3 रुपयांचा हा शेअर एका दिवसांत 2,36,000 रुपायांवर पोहचला, 66,92,535 टक्के रिटर्न

PMJAY: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिवाळी गिफ्ट, मोठी घोषणा करत 5 लाखांपर्यंत… दरवर्षी मिळणार लाभ

लग्झरी हॉटेल, 2 किलो सोने, 14 किलो चांदी, महागडी दारू, कोट्यवधीची जमीन… सरकारी अधिकाऱ्याची काळी कमाई
कस्टमर्स आणि डिमांड-सप्लाई
नवीन कार घेण्यासाठी कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये हवे आहे. अनेक ग्राहक कार घेण्यासाठी कर्जही घेतात. तसेच काराची मागणीपेक्षा सप्लाय जास्त आहे. परंतु रिलायन्सचा ट्रेंड असा उद्योगात राहिला आहे, जेथे पुरवठा कमी आणि मागणी जास्त आहे.
कॅपिटल इन्वेस्टमेंट
ऑटोमोबइल इंडस्ट्रीसाठी मोठी गुंतवणूक लागते. त्यासाठी रिसर्च एंड डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंग यासारखी अनेक कामे करावी लागतात. त्यात मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैसे खर्च होतात. त्यामुळे ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये पैसा लावण्यापूर्वी ज्या व्यवसायात रिलायन्स आधीपासून आहे, त्या ठिकाणी पैसा लावण्यावर भर दिला जातो.
बाजारातील स्पर्धा
ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये आधीपासून खूप स्पर्धा आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा यासह इतर आंतरराष्ट्रीय ब्रँड ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये आहे. रिलायन्स या क्षेत्रात आला तर मोठ्या गुंतवणुकीबरोबर मोठ्या स्पर्धेलाही सामोरे जावे लागेल.
रिन्यूएबल एनर्जी
रिलायन्स रिन्यूएबल एनर्जी म्हणजे अक्षय उर्जा क्षेत्रातही पुढे जात आहे. परंतु ऑटोमोबाइल सेक्टर इंधनावर अवलंबून आहे. यामुळे दोन्ही सेक्टरमध्ये स्पर्धा होऊ शकते. त्यातच आता इलेक्ट्रिक व्हेइकलचा ट्रेंड वाढत आहे.
इलेक्ट्रिक व्हेईकल इंडस्ट्री
रिलायन्स इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नोलॉजी आणि बॅटरी व्यवसायात आहे. परंतु हा सुद्धा B2B व्यवसाय आहे. जर मुकेश अंबानी यांनी कार बनवण्यास सुरुवात केली तर या ठिकाणी त्यांच्याच व्यवसायात स्पर्धा होईल.