Homeऑटोमोबाईलकिंमत गगनाला भिडली तरीही या आलिशान कारला मार्केटमध्ये जबरदस्त मागणी; 20 दिवसाच्या...

किंमत गगनाला भिडली तरीही या आलिशान कारला मार्केटमध्ये जबरदस्त मागणी; 20 दिवसाच्या आत वर्षभराचा स्टॉक संपला

New Kia Carnival: नवीन किया कार्निवलच्या वाढत्या मागणीमुळे, वेटिंग पीरियडमध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे. ड्युअल इलेक्ट्रिक सनरूफसोबतच या कारमध्ये इतरही अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम114735485

Kia Motors ने अलीकडेच आपली नवीन प्रीमियम कार Kia Carnival लाँच केली आहे. या कारने येताच खळबळ उडवून दिली आहे. समोर आलेल्या बातमीनुसार 20 दिवसांत त्याचा वर्षभराचा स्टॉक संपला आहे. कार्निवल एकाच पूर्ण-लोड केलेल्या व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ज्यामध्ये फक्त दोन एक्सटिरियर पेंट शेड पर्याय आहेत आणि एकच 7-सीट सीटिंग लेआउट आहे.
(वाचा)-Diwali Car Parking Tips: फटाक्यांमुळे तुमची दिवाळी बे’कार’ होऊ देऊ नका! कार सेफ्टीसाठी फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स

Kia Carnival MPV ची एक्स-शोरूम किंमत 63.9 लाख रुपये आहे. वाढत्या मागणीमुळे वेटिंग पीरियडही जवळपास 1 वर्षाचा झाला आहे. नवीन किया कार्निवलमध्ये आधीच्या मॉडेलपेक्षा जास्त स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. यासोबतच नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. या Kia कारमध्ये बरीच जागाही देण्यात आली आहे.

न्यू किया कार्निवलमध्ये ही उत्तम फीचर आहेत उपलब्ध

नवीन किया कार्निवलमध्ये, तुम्हाला वेंटिलेशनसह पॉवर सीट्स मिळतात. या कारमधील लेगरूमची स्पेस इतकी चांगली आहे की तुम्ही पाय पसरून सहज बसू शकता. Kia ची ही नवीन कार ADAS आणि 12-स्पीकर बोस ऑडिओ सिस्टमने सुसज्ज आहे. वाहनात 360-डिग्री कॅमेराची सुविधा देखील देण्यात आली आहे. ड्युअल इलेक्ट्रिक सनरूफसोबतच या कारमध्ये इतरही अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत.
(वाचा)-गाड्यांसाठी यंदा नो वेटिंग! तुम्ही ऑर्डर करतात मिळेल गाडीची चावी, वाचा बातमी

किया कार्निवल पॉवरट्रेन आणि मायलेज

यासह, नवीन किया कार्निवल पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेनसह उपलब्ध आहे. याचे पेट्रोल व्हेरिएंट खूपच स्मूथ आहे आणि चांगली पॉवर देते. जर तुम्ही दिल्ली एनसीआरमध्ये ही कार चालवत असाल तर ती तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे, कारण इथे पेट्रोल व्हेरिएंट कारची मागणी वाढत आहे. ही कार चालवणे खूपच आरामदायक आहे. ही कार 14.85 kmpl चा मायलेज देते. रोड ट्रिपला जाण्यासाठी ही कार चांगली आहे. Kia Carnival ची एक्स-शोरूम किंमत 63.90 लाख रुपयांपासून सुरू होते.
(वाचा)-Mahindra Thar 3-Door Earth एडिशनवर भरघोस सूट; जाणून घ्या डिटेल्स

हर्षदा हरसोळे

लेखकाबद्दलहर्षदा हरसोळेहर्षदा सुदर्शन हरसोळे ही हुशार आणि चांगली लेखिका आहे. गेल्या तीन वर्षांपासून हर्षदा या पत्रकारितेत चांगल आणि उत्तम काम करत आहेत. हर्षदा यांनी त्यांच्या कामाची सुरुवात प्रिंट माध्यपासून केली. व त्यांनी या मध्ये एक वेगळाच ठसा उमटवला आहे. हर्षदा यांची दृष्टी उत्सुकता असणारी आणि चौकस बुद्धीची आहे. तसेच हर्षदा या कोणतेही काम अगदी चांगल्या प्रकारे हाताळतात. यांना वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायला, आणि शिकायला आवडतं. तसेच हर्षदाचं लिखाण वैविध्यपूर्ण आहे.

प्रिंट मीडियाचं जे जग आहे त्याच्यात हर्षदा यांचा प्रवास खूप चांगला राहिला आहे. तसेच यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे बिट असतात त्यांनी त्या उत्तम प्रकारे सांभाळल्या आहेत. ऍटोमोबाइल पासून लाईफस्टाईल पर्यंत किंवा बॉलीवूड यासारखे बिट त्यांनी कौशल्यपूर्ण हाताळल्या आहेत. तसेच या कामासाठी जे तंत्रज्ञान वापरावं लागतं ते सुद्धा त्या चांगल्या हाताळतात. वेगवेगळ्या विषयांचे जे मुद्दे असतात ते हर्षदा पटकन समजून घेते. त्यामुळे त्यांच्या लिखाणात कायम वैविध्य दिसतं.

गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारितेमध्ये त्यांनी अगदी मन लावून आणि छान काम केलं आहे. यामुळे हर्षदाचा या क्षेत्रातला अनुभव वाढत गेलाय आणि त्या एक्स्पर्ट झाल्या आहेत. या क्षेत्रात जसे बदल होत गेले तसे हर्षदा यांनी त्यांच्या कामात केले आहे. तसेच हर्षदा मन लावून विचारपूर्वक लिखाण करतात. जे वाचकांना आकर्षक करणार असतं, आणि चांगली माहिती देणार असतं. तसेच हर्षदा यांना नवं नवीन गोष्टी शिकण्याची आणि समजून घेण्याची प्रचंड आवड आहे.

हर्षदा बद्दल एक सांगायचं झाल्यास, या व्यावसायिक गुणांच्या व्यक्तीरिक्त हर्षदा यांना काही छंद आहेत. त्यांना फोटोग्राफी आवडते, तसेच चांगले क्षण टिपायला देखील आवडतात…. आणखी वाचा

Source

Must Read

spot_img