India vs New Zealand 2nd Test Live Updates । पुणे : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही यजमान भारताची ‘कसोटी’ पाहायला मिळत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात २५९ धावा केल्या. मात्र, टीम इंडिया आपल्या पहिल्या डावात अवघ्या १५६ धावांत गडगडल्याने भारताच्या पदरी पिछाडी आली. न्यूझीलंडने या आघाडीचा फायदा घेत दुसऱ्या डावात साजेशी खेळी केली. पण, भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली सोप्या चेंडूवर बाद झाल्याने त्याला ट्रोल केले जात आहे. अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला विराट कोहलीकडून मोठी आस होती. पण तो तर फुलटॉस चेंडूवरच फसला अन् मिचेल सँटनरने टीम इंडियाला ‘विराट’ धक्का दिला. विराट नऊ चेंडूत एक धाव करुन बाद झाला.
विराट कोहली सोप्या चेंडूवर बाद होताच भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी त्याच्यावर तोंडसुख घेतले. विराटने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात खराब शॉर्ट खेळला असल्याचे मांजरेकरांनी म्हटले. सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यांनी सांगितले की, विराट कोहलीलाही माहिती आहे की, त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब शॉर्ट खेळला… त्याच्या भावना आपण समजू शकतो. कारण तो नेहमीच संघासाठी काहीतरी चांगले करण्याच्या इराद्याने मैदानात येत असतो.
Oh dear! Virat will know himself that he has just played the worst shot of his career to get out. Got to feel for him…coz as always he came out with solid & honest intent.
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) October 25, 2024
Virat Kohli out 🥺🥺🥺#ViratKohli#INDvsNZpic.twitter.com/49ytD5Jewv
— Virat (@chiku_187) October 25, 2024
भारताचा संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रिषभ पंत, शुबमन गिल, सर्फराज खान, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंडचा संघ –
टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हिन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, जोशुआ फिलिप्स, टीम साउथी, मिचेल सँटनर, ओ’रुर्के, एजाझ पटेल.