Homeऑटोमोबाईलmahindra xuv 3xo: किमतीत वाढ होऊनही कमी होत नाहीये मागणी; आज बुक...

mahindra xuv 3xo: किमतीत वाढ होऊनही कमी होत नाहीये मागणी; आज बुक केल्यास वर्षभरानंतर मिळेल कारची डिलिव्हरी

Mahindra XUV 3XO Waiting Period: Mahindra XUV 3XO ही देशातील सर्वात लोकप्रिय कार बनत आहे. ही कार लाँच होऊन केवळ सहा महिने झाले आहेत आणि दर महिन्याला या कारच्या सरासरी 8 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम114532497

महिंद्रा XUV 3XO एप्रिल 2024 मध्ये बाजारात लाँच झाली. या कारची सुरुवातीची किंमत 7.49 लाख रुपये ठेवण्यात आली होती. महिंद्राने नुकतीच या कारची सुरुवातीची किंमत 30 हजार रुपयांनी वाढवली आहे. मात्र या वाहनाच्या किमतीत वाढ होऊनही मागणीत घट झालेली नाही. लाँच झाल्यापासून या कारची क्रेझ आहे. आता Mahindra XUV 3XO चा वेटिंग कालावधी एक वर्षावर पोहोचला आहे. म्हणजेच या धनत्रयोदशीला जर तुम्ही ही गाडी बुक केली तर पुढच्या दिवाळीला तुम्हाला या कारची डिलिव्हरी मिळेल.

Mahindra XUV 3XO ने XUV 300 ला टाकले मागे

Mahindra XUV 3XO लाँच होऊन फक्त सहा महिने झाले आहेत. या सहा महिन्यांत ह्या कारचे महिंद्रा XUV 300 मागे टाकले आहे. महिंद्राची सर्वात लोकप्रिय कार XUV 300 ने दर महिन्याला 5000 युनिट्सची विक्री करण्याचा विक्रम केला होता. त्याचबरोबर XUV 3XO ने विक्रीच्या बाबतीत या वाहनालाही मागे टाकले आहे. गेल्या महिन्यांत, Mahindra XUV 3XO ने दरमहा सरासरी 8,400 युनिट्सची विक्री केली आहे.

maharashtra timesयंदाच्या दिवाळीत Audi, BMW, Mercedes सारख्या लग्झरी कार खरेदी करण्याचा विचार करताय? मिळत आहे लाखो रुपयांचे डिस्काउंट

Mahindra XUV 3XO वेटिंग पीरियड

Mahindra XUV 3XO चा वेटिंग पीरियड वाढत आहे. एंट्री-लेव्हल पेट्रोल व्हेरिएंटसाठी जास्त वेटिंग पीरियड आहे, जो एक वर्षापर्यंत पोहोचला आहे, XUV 3XO मधील सर्वात कमी वेटिंग पीरियड AX7 आणि AX7 L व्हेरिएंटचा आहे. कारच्या पेट्रोल व्हेरिएंटसाठी बुकिंग केल्यानंतर, तुम्हाला फक्त दोन महिने वेटिंग करावी लागेल, तर या मॉडेलच्या डिझेल व्हेरिएंटसाठी केवळ एक महिन्याचा वेट करावा लागेल.

महिंद्रा XUV 3XO किंमत

Mahindra XUV 3XO मध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 111 hp पॉवर निर्माण करते. यात 1.2-लीटर डायरेक्ट इंजेक्शन पेट्रोल व्हेरिएंट देखील आहे, जो 131 एचपी पॉवर निर्माण करतो. त्याच वेळी, या कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिनचा पर्याय देखील देण्यात आला आहे, जो या कारला 117 एचपीचा पॉवर देतो. Mahindra XUV 3XO च्या किमतीत वाढ झाल्यानंतर या कारची एक्स-शोरूम किंमत 7.79 लाख रुपये झाली आहे. तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 15.49 लाख रुपये झाली आहे.

हर्षदा हरसोळे

लेखकाबद्दलहर्षदा हरसोळेहर्षदा सुदर्शन हरसोळे ही हुशार आणि चांगली लेखिका आहे. गेल्या तीन वर्षांपासून हर्षदा या पत्रकारितेत चांगल आणि उत्तम काम करत आहेत. हर्षदा यांनी त्यांच्या कामाची सुरुवात प्रिंट माध्यपासून केली. व त्यांनी या मध्ये एक वेगळाच ठसा उमटवला आहे. हर्षदा यांची दृष्टी उत्सुकता असणारी आणि चौकस बुद्धीची आहे. तसेच हर्षदा या कोणतेही काम अगदी चांगल्या प्रकारे हाताळतात. यांना वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायला, आणि शिकायला आवडतं. तसेच हर्षदाचं लिखाण वैविध्यपूर्ण आहे.

प्रिंट मीडियाचं जे जग आहे त्याच्यात हर्षदा यांचा प्रवास खूप चांगला राहिला आहे. तसेच यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे बिट असतात त्यांनी त्या उत्तम प्रकारे सांभाळल्या आहेत. ऍटोमोबाइल पासून लाईफस्टाईल पर्यंत किंवा बॉलीवूड यासारखे बिट त्यांनी कौशल्यपूर्ण हाताळल्या आहेत. तसेच या कामासाठी जे तंत्रज्ञान वापरावं लागतं ते सुद्धा त्या चांगल्या हाताळतात. वेगवेगळ्या विषयांचे जे मुद्दे असतात ते हर्षदा पटकन समजून घेते. त्यामुळे त्यांच्या लिखाणात कायम वैविध्य दिसतं.

गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारितेमध्ये त्यांनी अगदी मन लावून आणि छान काम केलं आहे. यामुळे हर्षदाचा या क्षेत्रातला अनुभव वाढत गेलाय आणि त्या एक्स्पर्ट झाल्या आहेत. या क्षेत्रात जसे बदल होत गेले तसे हर्षदा यांनी त्यांच्या कामात केले आहे. तसेच हर्षदा मन लावून विचारपूर्वक लिखाण करतात. जे वाचकांना आकर्षक करणार असतं, आणि चांगली माहिती देणार असतं. तसेच हर्षदा यांना नवं नवीन गोष्टी शिकण्याची आणि समजून घेण्याची प्रचंड आवड आहे.

हर्षदा बद्दल एक सांगायचं झाल्यास, या व्यावसायिक गुणांच्या व्यक्तीरिक्त हर्षदा यांना काही छंद आहेत. त्यांना फोटोग्राफी आवडते, तसेच चांगले क्षण टिपायला देखील आवडतात…. आणखी वाचा

Source

Must Read

spot_img