India vs New Zealand 2nd Test Live Updates: बंगळुरूतील पहिल्या कसोटीत अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आजपासून (गुरुवार) पुण्यात गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर दुसरी कसोटी खेळत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने आपल्या संघात १ बदल केला आहे. दुखापीतमुळे मॅट हेनरी संघाबाहेर झाला असून त्याच्या जागी स्पिनर मिचेल सँटनरने संघात जागा मिळवली आहे. भारताने देखील संघात तीन महत्त्वाचे बदल केले आहेत. वॉशिंग्टन सुंदर तब्बल साडे तीन वर्षांनंतर कसोटी क्रिकेट खेळणार आहे. आकाश दीपला संघात स्थान मिळाले आहे आणि शुबमन गिल संघात आला आहे. केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव या तिघांना संघातून वगळण्यात आले आहे.
🚨 Team Update 🚨
3⃣ changes for #TeamIndia in the 2nd Test
A look at our Playing XI 👌👌
Live – https://t.co/YVjSnKCtlI#INDvNZ | @IDFCFIRSTBankpic.twitter.com/O3DFFmNF7r
— BCCI (@BCCI) October 24, 2024
दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला रोखण्याच्या निश्चयानेच भारतीय संघ मैदानावर उतरला आहे. एमसीएची खेळपट्टी भारताची स्थिती पाहून तयार करण्यात आली आहे. खेळपट्टीवर गवत नसून ती काळ्या मातीने तयार केली आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांचे चेंडू बंगळुरूप्रमाणे येथे उसळी घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे फिरकीपटूंच्या मदतीने भारतीय संघ मालिकेत बरोबरी साधण्याचा कसोशीने प्रयत्न करेल. मात्र, भूतकाळात अशा खेळपट्ट्या भारतही फसला आहे. त्यामुळे मालिकेत १-०ने पिछाडीवर असलेल्या भारतासाठी हा एक सामना म्हणजे खरी ‘कसोटी’ असणार आहे.
भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रिषभ पंत, शुबमन गिल, सर्फराज खान, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंडचा संघ: टॉम लॅथम (कर्णधार), डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरेल मिशेल, टॉम ब्लंडेल, जोशुआ फिलिप्स, टीम साउथी, मिचेल सॅन्टनर, ओ’रुर्के, एजाझ पटेल