Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 

Prathamesh
2 Min Read

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर गुरुवार, २४ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या सामन्यात भारताच्या दिग्गज खेळाडू विराट कोहलीला काही महत्त्वाचे विक्रम गाठण्याची संधी आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ७० धावांची खेळी करणाऱ्या कोहलीकडून या सामन्यात चाहत्यांना आणखी मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. कोहलीने या सामन्यात गाठू शकणाऱ्या ५ महत्त्वाच्या विक्रमांवर नजर टाकूयात:

  1. डेविड वॉर्नरला मागे टाकण्याची संधी
    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली सध्या डेविड वॉर्नरच्या मागे आहे. वॉर्नरने २४२३ धावा केल्या आहेत तर कोहलीच्या नावावर २४०४ धावा आहेत. पुण्यात २० धावा करताच कोहली वॉर्नरला मागे टाकेल.
  2. डॉन ब्रॅडमनचा विक्रम तोडण्याची संधी
    डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर कसोटीत २९ शतके आहेत आणि कोहलीनेही २९ शतके झळकावली आहेत. पुण्यातील सामन्यात शतक केल्यास कोहली ब्रॅडमनच्या पुढे जाईल.
  3. सनथ जयसूर्याच्या अर्धशतकांच्या विक्रमावर मात
    विराट कोहलीने आतापर्यंत ३१ कसोटी अर्धशतके झळकावली आहेत. आणखी एक अर्धशतक झळकवल्यास तो जयसूर्या, ग्रेग चॅपल, तमीम इक्बाल आणि ब्रँडन मॅक्ल्युलम यांना मागे टाकेल.
  4. ग्राहम डाउलिंगचा रेकॉर्ड तोडण्याची संधी
    कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध ९३६ कसोटी धावा केल्या आहेत. ग्राहम डाउलिंग यांच्याकडे ९६४ धावा आहेत. २९ धावा करताच कोहली डाउलिंगला मागे टाकेल.
  5. आशियाई मैदानात १६ हजार धावा पूर्ण करण्याचा टप्पा
    कोहलीला आशियाई मैदानात १६ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्यासाठी ५५ धावांची गरज आहे. सध्या तो या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

कोहली या पाच विक्रमांपैकी किती विक्रम साध्य करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

यासारख्या अधिक अपडेट्ससाठी, आम्हाला Facebook, Twitter, Instagram, Pinterest, Telegram, WhatsApp आणि Reddit वर फॉलो करा आम्ही तुमच्यासाठी ताज्या बातम्या घेऊन येत राहू.

Share This Article