दिवाळीचा आनंद होणार द्विगुणित! मारुती सुझुकीच्या नवीन गाड्यांवर हजारो रुपयांची सूट; जाणून घ्या डिटेल्स

Prathamesh
5 Min Read

Maruti Suzuki Diwali Offers: जर तुम्हाला दिवाळीला नवीन मारुती सुझुकी कार घ्यायची असेल तर मोठी बचत करता येईल. सणासुदीच्या काळात वाहन कंपन्या भरघोस डिस्काउंट ऑफर देत आहेत, ज्याद्वारे हजारो रुपयांची बचत होऊ शकते. तुम्हीही या दिवाळीत मारुती सुझुकी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या ऑफर्सचा नक्कीच विचार करा.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम114453222

दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकजण नवीन कार खरेदी करतात. जर तुम्हाला नवीन कार खरेदीवर सूट मिळाली तर तुम्हाला दुप्पट आनंद होईल. मारुती सुझुकी तुम्हाला नवीन कार खरेदीवर भरघोस सूट देत आहे.

दिवाळीत एरिना लाइनअप कार काही हजार रुपयांनी स्वस्त मिळू शकतात. मारुती सुझुकी या लाइनअप अंतर्गत अनेक कार विकते. तुम्हालाही या गाड्यांवरील ऑफर्सचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांचे डिटेल्स येथे वाचा.

मारुती सुझुकी ब्रेझा:

तुम्हाला मारुती सुझुकी ब्रेझा खरेदीवर चांगली सूट मिळू शकते. ही कार 25,000 रुपयांपर्यंत डिस्काउंटसह उपलब्ध आहे. तुम्ही डीलरशिप लेव्हलवर या ऑफरचा लाभ घेऊ शकता. या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 8.34 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 13.98 लाख रुपयांपर्यंत जाते.

मारुती सुझुकी वॅगनआर:

दिवाळीला मारुती सुझुकी वॅगन आर खरेदी करणे देखील फायदेशीर ठरू शकते. या कारवर 45,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. वॅगन आर ही मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 5.54 लाख ते 7.20 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट:

मारुती स्विफ्टचे नवे मॉडेल नुकतेच लाँच करण्यात आले आहे. तुम्ही ही कार खरेदी केल्यास तुम्हाला 35,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. नवीन स्विफ्ट सीएनजीवर 15,000 रुपयांपर्यंत सूटही मिळणार आहे. लेटेस्ट स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत ६.४९ लाख ते ९.४४ लाख रुपये आहे.

maharashtra timesToyota Innova Crysta: दिवाळीत बुकींग केल्यास पुढच्या वर्षी मिळेल कारची डिलिव्हरी; टोयोटा इनोव्हा क्रिस्टाचा वेटिंग पीरियड वाढला

मारुती सुझुकी डिझायर :

मारुती सुझुकी डिझायरलाही मोठी मागणी आहे. Dezire खरेदी करून 40,000 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते. त्याच्या सीएनजी व्हर्जन खरेदीवर कोणतीही सूट नाही. डिझायरचे नेक्स्ट जनरेशन मॉडेलही येऊ शकते. मारुती डिझायरची एक्स-शोरूम किंमत ६.५६ लाख ते ९.३३ लाख रुपये आहे.

Maruti Suzuki Alto K10:

Maruti Alto K10 ही कंपनीच्या लोकप्रिय कारपैकी एक आहे. ही कार खरेदी करून 52,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे. या कारचे काही व्हेरिएंट 35,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळू शकतात. Alto K10 ची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख ते 5.96 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेसो: मारुती सुझुकी एस-प्रेसो देखील डिस्काउंटसह खरेदी केली जाऊ शकते. दिवाळीला ही कार 55,000 रुपयांपर्यंत स्वस्तात मिळू शकते. त्याची CNG आवृत्तीही कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. मारुती सुझुकी एस-प्रेसोची एक्स-शोरूम किंमत 4.26 लाख ते 6.11 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो:

मारुती सुझुकी सेलेरियोमध्ये तीन-सिलेंडर 1.0 लिटर पेट्रोल इंजिन आहे. या कारवर तुम्हाला 55,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. स्वस्त व्हेरिएंट खरेदी करण्यावर तुम्हाला कमी सूट मिळेल. Celerio ची एक्स-शोरूम किंमत 5.36 लाख ते 7.04 लाख रुपये आहे.

हर्षदा हरसोळे

लेखकाबद्दलहर्षदा हरसोळेहर्षदा सुदर्शन हरसोळे ही हुशार आणि चांगली लेखिका आहे. गेल्या तीन वर्षांपासून हर्षदा या पत्रकारितेत चांगल आणि उत्तम काम करत आहेत. हर्षदा यांनी त्यांच्या कामाची सुरुवात प्रिंट माध्यपासून केली. व त्यांनी या मध्ये एक वेगळाच ठसा उमटवला आहे. हर्षदा यांची दृष्टी उत्सुकता असणारी आणि चौकस बुद्धीची आहे. तसेच हर्षदा या कोणतेही काम अगदी चांगल्या प्रकारे हाताळतात. यांना वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायला, आणि शिकायला आवडतं. तसेच हर्षदाचं लिखाण वैविध्यपूर्ण आहे.

प्रिंट मीडियाचं जे जग आहे त्याच्यात हर्षदा यांचा प्रवास खूप चांगला राहिला आहे. तसेच यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे बिट असतात त्यांनी त्या उत्तम प्रकारे सांभाळल्या आहेत. ऍटोमोबाइल पासून लाईफस्टाईल पर्यंत किंवा बॉलीवूड यासारखे बिट त्यांनी कौशल्यपूर्ण हाताळल्या आहेत. तसेच या कामासाठी जे तंत्रज्ञान वापरावं लागतं ते सुद्धा त्या चांगल्या हाताळतात. वेगवेगळ्या विषयांचे जे मुद्दे असतात ते हर्षदा पटकन समजून घेते. त्यामुळे त्यांच्या लिखाणात कायम वैविध्य दिसतं.

गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारितेमध्ये त्यांनी अगदी मन लावून आणि छान काम केलं आहे. यामुळे हर्षदाचा या क्षेत्रातला अनुभव वाढत गेलाय आणि त्या एक्स्पर्ट झाल्या आहेत. या क्षेत्रात जसे बदल होत गेले तसे हर्षदा यांनी त्यांच्या कामात केले आहे. तसेच हर्षदा मन लावून विचारपूर्वक लिखाण करतात. जे वाचकांना आकर्षक करणार असतं, आणि चांगली माहिती देणार असतं. तसेच हर्षदा यांना नवं नवीन गोष्टी शिकण्याची आणि समजून घेण्याची प्रचंड आवड आहे.

हर्षदा बद्दल एक सांगायचं झाल्यास, या व्यावसायिक गुणांच्या व्यक्तीरिक्त हर्षदा यांना काही छंद आहेत. त्यांना फोटोग्राफी आवडते, तसेच चांगले क्षण टिपायला देखील आवडतात…. आणखी वाचा

Source

Share This Article