INDA vs AUSA : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा केली असून, इशान किशनची मोठ्या कालावधीनंतर संघात एन्ट्री झाली आहे. टीम इंडिया ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात असेल. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात ३१ ऑक्टोबरपासून दोन प्रथम श्रेणी (चार दिवसीय) सामने खेळवले जातील. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दोन सामन्यांनंतर टीम इंडिया आपल्या वरिष्ठ संघाविरुद्ध एक सामना खेळेल.
मागील मोठ्या कालावधीपासून भारताच्या वरिष्ठ संघातून बाहेर असलेला इशान किशन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये दिसणार आहे. इशान किशनने मानसिक थकवा जाणवत असल्याचे सांगत क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. तेव्हापासून त्याचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकले नाही.
भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ वेळापत्रक
पहिला सामना – ३१ ऑक्टोबर-३ नोव्हेंबर, मकाय
दुसरा सामना – ७ नोव्हेंबर-१० नोव्हेंबर, मेलबर्न
भारत अ विरुद्ध वरिष्ठ भारतीय संघ, इन्ट्रा स्क्वॅड मॅच – १५-१७ नोव्हेंबर, पर्थ
भारतीय संघ –
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, बाबा इंद्रजीत, इशान किशन, अभिषेक पोरेल, मुकेश कुमार, खलील अहमद, यश दयाल, नवदीप सैनी, मानव सुथार, तनुष कोटियन.
🚨 NEWS 🚨
Ruturaj Gaikwad to lead India A for tour of Australia.
Squad details 🔽 #TeamIndia
— BCCI (@BCCI) October 21, 2024