Bajaj pulsar n125 unveiled: देशातील आघाडीच्या दुचाकी उत्पादक बजाजने भारतीय बाजारपेठेत अनेक बाईक्स ऑफर केल्या आहेत. कंपनी आपली नवीन बाईक बजाज पल्सर N125 नवीन मॉडेल 2024 लवकरच लाँच करण्याच्या तयारीत आहे. सोशल मीडियावर रिलीज झालेल्या टीझरमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स देण्यात आले आहेत? त्याची किंमत काय असणार? हे आपण जाणून घेऊया.
टिझर रिलीज
कंपनीने या बाईकचा नवा टीझर सोशल मीडियावर रिलीज केला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या टीझरमध्ये त्याच्या अनेक फीचर्सची माहिती मिळाली आहे.
(वाचा)- Two Wheeler Sales: 6 वर्षांनंतर दुचाकींची विक्री 1 कोटींच्या पुढे, लक्झरी कारचीही वाढली मागणी
काय असेल खासियत
या बाईकचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये बाईक पूर्ण झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली आहे. टीझरमध्ये दाखवल्या युनिटचा कलर वेगवेगळ्या कलरमध्ये पाहायला मिळाले आहे. त्यात हनीकॉम्ब स्टाईल ग्राफिक्स आहेत. तसेच, बाईकमध्ये पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी हेडलाइट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, अलॉय व्हील्स, डिस्क ब्रेक, फ्रंट फोर्क्सवर प्लास्टिक कव्हर, स्प्लिट सीट, सिल्व्हर कलरची ग्रॅब रेल दिली जाईल. दरम्यान ही बाईक अफॉर्डेबल परफॉर्मेंस बाईक आहे. यात असलेले इंजिन आणि चेसीस पूर्णपणे नवीन आहे.
किती पॉवरफूल इंजिन
125 सीसी सेगमेंटमध्ये येत असलेल्या या बाईकला सामान्य पल्सर 125 पेक्षा अधिक पॉवरफूल इंजिन मिळेल. 125 सीसी इंजिनमधून 11.8 पीएस पॉवर आणि 10.8 न्यूटन मीटर टॉर्क मिळू शकेल अशी अपेक्षा आहे.
(वाचा)- Citroen SUV C3 Aircross च्या विक्रीत घट; गेल्या सप्टेंबरमध्ये केवळ 41 ग्राहकांनी खरेदी केली कार, जाणून घ्या नेमकं कारण काय?
कितमीबद्दल अजून अद्याप कोणतीही माहिती नाही
नवीन बजाज पल्सर N125 किमतीचा खुलासा 21 ऑक्टोबररोजी करण्यात येईल.
स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीची सुविधाही उपलब्ध
बाईकच्या पुढील भागात टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील मोनोशॉक दिसू शकतात. नवीन पल्सरमध्ये डिजिटल कन्सोलही मिळू शकेल, सोबतच स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीची सुविधाही उपलब्ध असेल.
कोणाशी होणार स्पर्धा?
बजाजची ही नवीन बाईक Honda Shine 125, Hero Xtreme 125, TVS Raider 125 सारख्या बाईकशी स्पर्धा करेल.