India vs New Zealand 1st Test, Sarfaraz Khan And Kuldeep Yadav Playing XI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या कसोटी सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. पण दुसऱ्या दिवशी मात्र खेळाला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ झाला नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी ९८ षटके फेकली जाणार आहेत.
शुबमन गिल आउट, सर्फराजला मिळाली संधी
टॉसनंतर भारतीय कर्णधाराने दोन बदलासह मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. शुबमन गिल अनफिट असल्यामुळे त्याच्या जागी सर्फराज खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. सर्फराज खान याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो संघाच्या ताफ्यात होता. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. याशिवाय फिरकीपटू कुलदीप यादवनंही प्लेइंग इलेव्हनमध्ये कमबॅक केले आहे. आकाश दीपच्या जागी त्याला संघात स्थान मिळाले आहे.
सर्फराजचा पहिला डाव फसला
पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघ गडबडला. रोहित आणि विराट कोहली स्वस्तात माघारी फिरल्यावर सर्फराज खान मैदानात आला. पण संधीच सोन करण्यात तो अपयशी ठरला. मैदानात उतरल्या उतरल्या मोठा फटका मारण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. डेवॉन कॉन्वे याने त्याचा अप्रतिम कॅच टिपला. भारतीय संघाने १० धावांवर त्याच्या रुपात तिसरी विकेट गमावली.
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, सरफराज खान, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन:
टॉम लॅथम (कर्णधार), डेवॉन कॉन्वे, विल यंग, डेरिल मिचेल, रचिन रविंद्र, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, टिम साउथी, मॅट हेन्री, जॅकब डफी, एजाज पटेल, विलियम ओरोर्के.