Homeऑटोमोबाईलदिवाळीत गाडी विकत घ्यायच्या विचारात असाल तर एक चांगली बातमी, हे वाचा

दिवाळीत गाडी विकत घ्यायच्या विचारात असाल तर एक चांगली बातमी, हे वाचा

 

Festival Sale : फेस्टिवल सीजन सुरु आहे. ऑटो कंपन्यांसाठी हा सुगीचा काळ आहे. आपला सेल वाढवण्यासाठी ऑटो कंपन्यांकडून मोठ्या डिस्काऊंट ऑफर्स दिल्या जात आहेत. टाटा मोटर्सने सुद्धा फेस्टिव सीजनमध्ये आपल्या गाड्यांवर डिस्काऊंटची घोषणा केली आहे. तुम्ही या सीजनमध्ये टाटाची गाडी विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही हे वाचलं पाहिजे. टाटाच्या कुठल्या, कुठल्या मॉडलवर तुम्हाला किती डिस्काऊंट मिळणार. या माहितीमुळे टाटाची नवीन गाडी विकत घेताना तुमच्या पैशांची मोठी बचत होऊ शकते.

टाटा मोटर्सच्या हॅचबॅक गाड्यांवर कंपनीकडून टियागोवर 65,000 रुपये. अल्ट्रोज प्रीमियम हॅचबॅकवर 45,000 रुपयापर्यंत डिस्काऊंट दिला जातोय. या दरम्यान टिगोर कॉम्पॅक्ट सेडानवर 30,000 रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. ही सूट पेट्रोल आणि सीएनजी दोघांवर उपलब्ध आहे. किंमत कमी करण्याशिवाय टाटा मोटर्स ग्राहकांना अजून अतिरिक्त फायदे सुद्धा देणार आहे.

कुठल्या गाड्यांवर किती लाखाचा डिस्काऊंट?

हॅरियरची 14.99 लाख रुपये आणि सफारीची सुरुवातीची किंमत 15.49 लाख रुपये आहे. सर्वात मोठा डिस्काऊंट टाटाची प्रमुख एसयूवी सफारीवर मिळतोय. यावर कंपनी 1.80 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट देत आहे. हॅरियर एसयूवीवर 1.60 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. याच प्रमाणे कंपनी आपली कॉम्पॅक्ट एसयूवी नेक्सनवर 80,000 रुपयापर्यंत डिस्काऊंट देत आहे.

कधीपर्यंत डिस्काऊंट ऑफर

टाटा मोटर्सकडून त्यांच्या कार्सवर हा डिस्काऊंट फेस्टिव सीजनमध्ये दिला जातोय. मर्यादीत काळासाठी ही ऑफर आहे. टाटाची गाडी विकत घ्यायला तुम्ही उशिर केलात, तर तुम्हाला या डिस्काऊंट ऑफरचा फायदा मिळणार नाही. टाटा मोटर्सकडून ही डिस्काऊंट ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे.

यासारख्या अधिक अपडेट्ससाठी, आम्हाला Facebook, Twitter, Instagram, Pinterest, Telegram, WhatsApp आणि Reddit वर फॉलो करा आम्ही तुमच्यासाठी ताज्या बातम्या घेऊन येत राहू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img