HomeऑटोमोबाईलCars Festive Offers : सणासुदीच्या दिवसात कार स्वस्त मिळते, पण त्यात तोटे...

Cars Festive Offers : सणासुदीच्या दिवसात कार स्वस्त मिळते, पण त्यात तोटे काय?

भारतात फेस्टिव सीजनमध्ये कार खरेदीला अनेक ग्राहकांची पसंती असते. अनेक ऑफर्स आणि डिस्काऊंटमुळे कार खरेदीची इच्छा होते. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, चूक आणि बरोबर. तुम्ही फेस्टिव डिस्काऊंट ऑफर्समध्ये कार खरेदीचा विचार करत असाल, तर काही फायदे आहेत, तसं नुकसानही आहे. फेस्टिव ऑफर्समध्ये मिळणाऱ्या सुविधा पाहता नुकसान दिसणं तसं कठीण असतं.

सणांच्या दिवसात कार कंपन्या आणि डीलर आकर्षक डिल्स ऑफर करतात. खासकरुन दसरा, दिवाळीच्या सुमारास तुम्हाला एकापेक्षाएक सरस ऑफर मिळतात. त्यामुळे नवीन कार खरेदी अजून स्वस्त होते. त्याशिवाय फेस्टिव सीजनमध्ये नवीन मॉडल लॉन्चमध्ये सुद्धा वाढ होते. ग्राहकांना एडवांस फीचर्ससह लेटेस्ट मॉडल मिळावेत म्हणून कार्सची अनेक नवीन मॉडल्स या काळात लॉन्च होतात.

फेस्टिव सीजनमध्ये कार खरेदी करताना काय नुकसान होऊ शकतं

बजेट कमी असेल तर कर्जाचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्यामुळे नवीन कार खरेदी सोपी बनते. पण सणासुदीच्या दिवसात कार विकत घेताना नुकसान सुद्धा होऊ शकतं.

लोक घाईगडबडीत निर्णय घेतात. लिमिटेड टाइम पीरियड ऑफरमुळे लोक योग्य माहिती मिळवू शकत नाहीत. कार खरेदी लवकर केल्यास ऑफर असते. त्यामुळे लोकांवर दबाव असतो.

सणांच्या काळात हाय डिमांडमुळे स्टॉक कमी पडू शकतो. पॉपुलर मॉडल लवकर विकले जातात. त्यामुळे ग्राहकांकडे कमी ऑप्शन राहतात.

अशा परिस्थितीत ग्राहकांना फार पसंतीच्या नसलेल्या कार्सवर तडजोड करावी लागेत किंवा डिलीवरीसाठी बराचवेळ थांबून रहावं लागतं.

कार्सची विक्री वाढल्यामुळे सर्विस क्वालिटीमध्ये घसरण होऊ शकते. वाढत्या ग्राहकसंख्येमुळे डीलरला आपले स्टँडर्ड फॉलो करताना अडचण येऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img